Pune Crime: पुणे पुन्हा हादरले! ५ वर्षांच्या चिमुकल्यावर अनैसर्गिक अत्याचार, कोंढव्यातील संतापजनक प्रकार

Pune : पुण्यामध्ये पुन्हा एकदा चिमुकल्यावर लैंगिक अत्याचाराची घटना समोर आली आहे. पुण्यातल्या कोंढव्यामध्ये ५ वर्षाच्या मुलावर ३ अल्पवयीन मुलांनी लैंगिक अत्याचार केले. पॉर्न व्हिडीओ दाखवत मुलासोबत अनैसर्गिक कृत्य करण्यात आले. या घटनेमुळे कोंढव्यामध्ये खळबळ उडाली आहे. कोंढवा पोलिस ठाण्यामध्ये ३ अल्पवयीन मुलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Pune Crime: पुण्यात चाललंय काय? तरुणीचे अपहरण करून विनयभंग, बोपदेव घाटातील दुसरी घटना

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात सलग तिसऱ्या दिवशी अत्याचाराची घटना घडली आहे. ५ वर्षांच्या चिमुकल्या मुलासोबत ३ अल्पवयीन मुलांनी अनैसर्गिक कृत्य केले. पॉर्न व्हिडिओ दाखवत चिमुकल्यावर अनैसर्गिक कृत्य करण्यात आले. पुण्यातील कोंढवा परिसरात शुक्रवारी ही घटना घडली. पिढीत मुलगा सोसायटीत खेळत असताना तिघांनी मोबाइलमधील अश्लील व्हिडीओ दाखवत त्याच्यावर लैंगिक अत्याचार केले.

धक्कादायक बाब म्हणजे पीडित मुलाच्या मोठ्या भावासमोर हे अनैसर्गिक कृत्य करण्यात आले. या घटनेप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात तिन्ही मुलांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलिस तपास करत आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply