
Pune : पुण्यामध्ये दोन चिमुकल्या शाळकरी मुलींवर स्कूल व्हॅनमध्ये लैंगिक अत्याचार करण्यात आले होते. या घटनेमुळे पुणेकरांमध्ये संतापाचे वातावरण आहे. या घटनेनंतर संतप्त झालेल्या वंचितच्या कार्यकर्त्यांनी ज्या स्कूलव्हॅनमध्ये ही घटना घडली होती त्याची तोडफोड केली होती. याप्रकरणी आता पुणे पोलिसांनी कारवाई करत वंचितच्या ९ कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास पुणे पोलिसांकडून सुरू आहे. या घटनेनंतर आरटीओ प्रशासन खडबडून जागे झाले असून त्यांना शाळांना महत्वाच्या सूचना दिल्या आहेत.
शाळकरी मुलींवर अत्याचार प्रकरणात जप्त केलेल्या स्कूलव्हॅनची तोडफोड केल्याप्रकरणी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसह ९ जणांविरुद्ध हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अत्याचाराच्या घटनेनंतर संतप्त कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत शुक्रवारी वाहनाची तोडफोड केली होती. वंचित बहुजन आघाडी माथाडी कामगार संघटनेचे अध्यक्ष विशाल कसबे, धर्मराज यादव लांडगे, मिलिंद हरिदास सरवदे, विशाल वंजारी, सचिन भडकवाड यांच्यासह ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत वानवडी पोलिस ठाण्यातील हवालदार जोतिबा कुरळे यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
|
|
पुण्यातील वानवडीत झालेल्या प्रकरणानंतर आरटीओ प्रशासन खडबडून जागे झाले आहे. पुणे शहरातील स्कूलबस, व्हॅनवर आरटीओने कारवाईचा बडगा सुरू केला आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून स्कूलबस आणि व्हॅनची धडक तपासणी मोहीम सुरू झाली आहे. नियमभंग करणाऱ्या वाहनांवर आरटीओकडून कारवाई केली जात आहे. आरटीओकडून शहरात एकूण १० पथके नियुक्त करण्यात आली असून त्यात एकूण २० अधिकारी आणि इतर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. शालेय विद्यार्थी वाहतूक नियमावलीचे पालन वाहतूकदारांकडून होत आहे का? याची तपासणी या पथकांकडून केली जाणार आहे.
वानवडीमधील घटनेनंतर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी शाळा प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. शाळा प्रशासनाने कर्मचारी किंवा स्कूलव्हॅन चालक ठेवताना चारित्र्य पडताळणी करुन घ्यावे. शाळा व्यवस्थापनात काही त्रुटी आढळल्यास थेट कारवाई करण्यात येणार आहे. पुण्यातील वानवडी भागात दोन चिमुरड्या मुलीवर स्कूलव्हॅन चालकनेच लैंगिक अत्याचार केला होता. याप्रकरणी स्कूलव्हॅन चालकाला पोलिसांनी अटक केली आहे.
शहर
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- मुंबई: एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळत सचिव महेंद्र हरपाळकर यांची केली बदली!
महाराष्ट्र
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- बीड: महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का; जळगावमध्ये नेत्यांचा पक्षाला रामराम, तर बीडमध्ये काँग्रेसची ताकद वाढली!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग

























Subscribe to my channel




