
Pune : जुन्नर शहर बुधवारी सकाळी घडलेल्या एका धक्कादायक घटनेने अक्षरशः हादरून गेले. सकाळी साधारण ११ वाजण्याच्या सुमारास आदिवासी मुलींच्या शासकीय वसतिगृहासमोर एक तरुण अचानक आला आणि काही कळायच्या आत त्याने महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर धारदार हत्याराने सपासप वार केले. दिवसाढवळ्या घडलेल्या या थरारक प्रकारामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं.
मिळालेल्या माहितीनुसार, २० वर्षीय एक विद्यार्थिनी नेहमीप्रमाणे वसतिगृहाच्या परिसरात उभी होती. त्याच वेळी महेश मुरलीधर डामसे नावाचा तरुण तेथे आला. सुरुवातीला काय घडतंय हे कुणालाच समजलं नाही. मात्र काही क्षणांतच त्याने हातातील धारदार हत्यार काढलं आणि तरुणीवर वार करण्यास सुरुवात केली. आरोपीने तिच्या चेहऱ्यावर आणि मानेवर सपासप वार केल्याची माहिती समोर येत आहे. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे वसतिगृहातील विद्यार्थिनी आणि नागरिक घाबरून गेले.
आरडाओरड ऐकून परिसरातील नागरिक आणि विद्यार्थिनी धावत बाहेर आल्या. मात्र तोपर्यंत आरोपी घटनास्थळावरून पसार झाला होता. जखमी अवस्थेत पडलेल्या विद्यार्थिनीला स्थानिकांनी तातडीने उचलून जवळच्या रुग्णालयात दाखल केले. सध्या तिच्यावर डॉक्टरांकडून उपचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान, जखमी विद्यार्थिनी आणि हल्ला करणारा तरुण हे दोघेही एकाच गावचे असल्याचे समोर आले आहे. आरोपी काही दिवसांपासून त्या तरुणीला त्रास देत होता, अशीही माहिती स्थानिकांकडून सांगितली जात आहे. त्यातूनच हा हल्ला झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
घटनेची माहिती मिळताच जुन्नर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी परिसराची पाहणी करून पंचनामा केला असून फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. या घटनेमुळे जुन्नरमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून आरोपीला तातडीने अटक करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
शहर
- पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरींनी स्पष्ट केले: भारतात गॅस तुटवड्याची चिंता नाही; पुरवठा अखंडित.
- Ahilyanagar : गॅस तुटवड्याच्या अफवा; शिर्डी-शनिशिंगणापूरमध्ये पुरवठा सुरळीत ठेवण्याचे आव्हान, अवैध रिफिलिंगवर प्रशासनाची नजर
- मध्य-पूर्व युद्धाच्या पार्श्वभूमीवर इंधन पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी केंद्र सरकारची उच्चस्तरीय समिती
- घरगुती गॅस तुटवड्याच्या भीतीमुळे उच्च न्यायालयाची केंद्राला नोटीस, पुरवठा वाढवण्याचे निर्देश
महाराष्ट्र
- Mumbai- शेअर बाजारात घसरण कायम: सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मोठी पडझड; जागतिक तणावाचा गुंतवणूकदारांना फटका
- Pune - चाकण-तळेगाव-शिक्रापूर पट्ट्यातील वाहतूक कोंडीतून तूर्तास सुटका नाही; 'एलिव्हेटेड कॉरिडॉर'साठी मोजावी लागणार आणखी ४ वर्षे!
- Mumbai - वाहनचालकांनो सावधान! थकीत ई-चलन दंडासाठी पोलीस आता 'बळजबरी' करू शकणार नाहीत; कोर्टाचा मोठा निर्णय
- BREAKING: मुंबईत मोठी खळबळ! विधानभवन उडवून देण्याची धमकी; अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान सुरक्षा यंत्रणांची धावपळ
गुन्हा
- Pimpri-Chinchwad : उच्चशिक्षित दुचाकीचोर अटकेत; 80 CCTV फुटेज तपासून पोलिसांची कारवाई, 22 लाखांच्या 40 बाईक जप्त
- विराग गुप्ता यांचा स्तंभ:”भारत टॅक्सी’ ओला आणि उबेरची जागा घेतेय का?
- प्रा. चेतनसिंह सोळंकी यांचा कॉलम:ऊर्जेसाठी इतर देशांवर अवलंबून राहणे हे अनेक समस्यांचे मूळ
- Pune - पुणे विमानतळावर कस्टमची मोठी कारवाई; बँकॉकहून आलेल्या प्रवाशांकडून ८ कोटींचे ड्रग्ज जप्त
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Pune- पुणे महापालिकेचा मोठा निर्णय! २३ गावांच्या विकासासाठी ९५४ कोटींचा ‘बूस्टर डोस’
- एलपीजीच्या वाढत्या किमती आणि संभाव्य तुटवडा: स्वयंपाकासाठीचे ५ आधुनिक व किफायतशीर पर्याय
- उन्हाळ्यात घामामुळे मेकअप उतरतो? दीर्घकाळ टिकवण्यासाठी 'या' सोप्या युक्त्या वापरा.
- उत्तर प्रदेश: जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
मनोरंजन
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
विडियो गॅलेरी

देश विदेश
- Pune - चाकण-तळेगाव-शिक्रापूर पट्ट्यातील वाहतूक कोंडीतून तूर्तास सुटका नाही; 'एलिव्हेटेड कॉरिडॉर'साठी मोजावी लागणार आणखी ४ वर्षे!
- Mumbai - वाहनचालकांनो सावधान! थकीत ई-चलन दंडासाठी पोलीस आता 'बळजबरी' करू शकणार नाहीत; कोर्टाचा मोठा निर्णय
- BREAKING: मुंबईत मोठी खळबळ! विधानभवन उडवून देण्याची धमकी; अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान सुरक्षा यंत्रणांची धावपळ
- Pune; पुणे रिंग रोडसाठी प्रशासनाची मोठी झेप; भूसंपादन पूर्णत्वाकडे, लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात!




























Subscribe to my channel
