
नाशिक : नाशिक ग्रामीण पोलीस सध्या अवैध धंद्याच्या समूळ उच्चाटन साठी विशेष मोहीम राबवित आहेत. त्याच पद्धतीने राज्य उत्पादन शुल्क विभाग अशा भामट्यांच्या मागावर असताना अवैध मद्याची वाहतूक करणाऱ्याला अटक करण्यात आली आहे. पालघर येथील मद्य तस्कराने टेम्पोमध्ये 12 प्लास्टिकच्या ड्रममध्ये साबण बनविण्याच्या जेलीच्या पाकिटातून महाराष्ट्रात प्रतिबंध असलेल्या तब्बल 1920 मद्याच्या बाटल्या वाहतूक करतांना राज्य उत्पादन शुल्क विभाग पथकाला मिळून आला. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने नाशिक जिल्ह्यातील कसबे वणी गावात एका हाॅटेलच्या समोर ही कारवाई केली.
राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार, विभागाच्या कळवण विभागाच्या पथकाला माहिती मिळाली. एका टेम्पो मधून मद्याची चोरटी वाहतूक होत असल्याचे गुप्त माहिती मिळालाय. त्यानुसार पथकाने वणी दिंडोरीरोडवर सापळा रचला. काही वेळातच या मार्गावरून संशयित टेम्पो येताना दिसून आल्याने त्याला थांबवण्यात आले. वाहनाची तपासणी केली असता टेम्पोमध्ये 12 प्लास्टिकचे सीलबंद ड्रम आढळून आले. वाहन चालक संशयित दिनानाथ सीताराम पाल याकडे चौकशी केली असता ड्रममध्ये साबण निर्मितीसाठी वापरण्यात येणाऱ्या जेलची पाकिटे असल्याचे सांगितले. त्यामुळे सुरवातीला ड्रममध्ये खरोखर जेली पाकिटे असावी असे पथकाच्या अधिकाऱ्यांना वाटले होते.
मात्र पोलीस अधिकाऱ्यांनी सहजच एक ड्रम उघडण्यास सांगितला असता चालकाने नकार दिल्याने पथकाला संशय आला. पोलिसांनी तात्काळ ड्रमचे सील तोडून पाहिले असता जेलीच्या पाऊचमध्ये मद्याच्या बाटल्या असल्याचे आढळून आले. 12 ड्रम मधून दादरा व नगर हवेली निर्मीत विदेशी मद्याचे 1920 बाटल्या पथकाने जप्त केल्या. अवैध मद्य वाहतूक करणाऱ्या चालकाकडून वाहन मालक, मद्यसाठा पुरवठादार आणि मद्य खरेदी करणारे ज्ञान अज्ञात इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान संशयित दीनानाथ पाल हा अनेक दिवसांपासून अशा पद्धतीने मद्याची चोरटी वाहतूक करत होता. मात्र अशा पद्धतीने पुष्पा स्टाईल वापरून वाहतूक करत असल्याने निदर्शनास येत नव्हते. शिवाय जेली पाकिटांची वाहतूक करत असल्याचे दिसत होते. या संदर्भातील कागदपत्रे तो बाळगून असल्याने पोलिसांना संशयाला जागा नसायची. यामुळेच तो तो पोलिसांच्या नजरेतून सुटत होता. मात्र यावेळी अधिकाऱ्यांनी योग्य तपास केल्याने संशयित दीनानाथ पाल च्या मुसक्या आवळण्यात आल्या.
शहर
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- गॅस सिलेंडर पोहचवणाऱ्या डिलिव्हरी बॉयची कमाई किती? एजन्सीला मिळणाऱ्या कमिशनचे संपूर्ण गणित!
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
महाराष्ट्र
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- नागपुरात आता कचरा फेकणाऱ्यांची खैर नाही! नाल्यांत आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर थेट FIR दाखल होणार.
- पुरोगामी कोल्हापूरला काळिमा! गुप्तधनाच्या लालसेपोटी अघोरी पूजा आणि काळ्या जादूचा बाजार; भोंदूगिरीचे वाढते पेव.
गुन्हा
- सेल्फीचा थरार की नियोजित घातपात? शाही लग्नाआधी केतन अग्रवालचा संशयास्पद मृत्यू; होणाऱ्या पत्नीला अटक!
- पुणे: पुन्हा गोळीबाराचा थरार! कात्रज-मंतरवाडी बायपासवर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी झाडल्या ४ गोळ्या.
- उत्तर प्रदेश: कौटुंबिक वादातून सख्ख्या भावाचा क्रूर अंत; भाऊ, भावजय आणि पुतण्याची निर्घृण हत्या!
- मुंबई: कल्याण मध्ये १५ वर्षीय मुलीवर आजोबांच्या वयाच्या दोघांकडून अत्याचार; दोन नराधमांना अटक!
राजकीय
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
इतर
- छत्रपती संभाजीनगरच्या अन्न प्रयोगशाळेत ढिगाऱ्याखाली तपासणी! कर्मचारी कमतरता आणि नादुरुस्त AC मुळे ४ हजार नमुने प्रलंबित.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!
- दैनिक राशिभविष्य २३ जून २०२६: आज कोणाचे नशीब चमकणार? जाणून घ्या तुमची रास काय सांगते!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
देश विदेश
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
- लव्ह मॅरेजनंतर पतीने केला दुसरा विवाह; न्यायासाठी चिमुरड्या मुलासह माय माऊली चढली मोबाईल टॉवरवर!
- भारताची जागतिक भरारी! जहाज पुनर्वापर (Ship Recycling) क्षेत्रात भारत जगात प्रथम क्रमांकावर, २०२५ मध्ये ३५.४ टक्के बाजार हिस्सा.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!


























Subscribe to my channel

