Pune Chandani Chowk Accident : पुण्यातील चांदणी चौकातील अपघातात चार प्रवासी जखमी,

Chandani Chowk  : पुण्यातील चांदणी चौकात आज (शुक्रवार) सकाळच्या सुमारास एका खासगी छाेट्या प्रवासी बसचा अपघात झाला. घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनूसार प्रवासी बसचा स्टेरिंग रॉड तुटल्याने बस पलटी झाली. 

आज सकाळी ७ वाजून ३५ मिनिटांनी चांदणी चाैकात अपघात झाल्याने येथील वाहतुक काही काळ विस्कळीत झाली. पाेलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार कर्वेनगरकडून हिंजवडीच्या दिशेने बस निघाली हाेती. या बसमध्ये चार प्रवासी हाेते. या अपघातात प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.

Mumbai Nashik Highway Accident : शहापूर नवीन कसारा घाटात चार वाहनांचा विचित्र अपघात; दोघांचा जागीच मृत्यू

या अपघातानंतर तातडीने काही वाहनधारक बसमधील प्रवाशांच्या मदतीला धावले. या अपघातामुळे चांदणी चाैकातील मार्गावरील वाहतुक काही काळ विस्कळीत झाली.रस्त्यावर पलटी झालेली प्रवासी बस रस्त्यावरून बाजूला काढण्याचे काम सुरू झाले हाेते. सध्या या मार्गावरील वाहतुक सुरळीत असल्याची माहिती पाेलिसांनी दिली

दरम्यान चांदणी चौकातील प्रकल्पाच्या मुख्य पुलाच्या गर्डर उभारणीसाठी मुख्य रस्त्यावरील वाहतूक सेवा रस्त्याने १५ जुलैपर्यंत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याची वाहन चालकांनी नाेंद घ्यावी असे आवाहन पाेलिसांनी केले आहे



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply