पुण्यात पाणी कपात, तरीही लाखो लिटर पाणी रस्त्यावर वाहतेय कोंढवा गंगाधाम रोडवर जलवाहिनी फुटली, ४-५ दिवसांपासून दुरुस्तीचा पत्ता नाही

 

 

पुणे : उन्हाळ्यात पाण्याची टंचाई आणि कपात जाहीर असतानाही पुणे महानगरपालिकेच्या (PMC) पाणी पुरवठा विभागाच्या दुर्लक्षामुळे कोंढवा परिसरात प्रचंड पाणी वाया जात आहे.
गंगाधाम रोडवरील प्राइड हॉस्पिटलसमोर मुख्य जलवाहिनी फुटल्याने हजारो ते लाखो लिटर पिण्याचे पाणी सतत रस्त्यावर वाहत आहे. शांतीनगर सोसायटी चौक ते इस्कॉन मंदिर चौक या मधल्या भागात ४ ते ५ दिवसांपासून गटारीत आणि रस्त्यावर पाणी वाहत असून, रस्त्याचे काम अर्धवट सोडले गेले आहे.
यामुळे परिसरात घाण वास येत असून, वाहने घसरून पडत आहेत. त्यामुळे या भागात सतत वाहतूक कोंडी होत आहे. जवळच असलेल्या प्राइड हॉस्पिटलमुळे रुग्ण, डॉक्टर आणि नातेवाईकांना ये-जा करताना मोठ्या अडचणी येत आहेत. पाण्यामुळे रस्ता खराब झाल्याने अपघाताचीही भीती व्यक्त केली जात आहे.
स्थानिक नागरिकांनी पुणे महानगरपालिकेकडे अनेकदा तक्रारी केल्या असूनही पाणी पुरवठा विभागाने अद्याप दुरुस्तीचे काम सुरू केलेले नाही. ऐन उन्हाळ्यात जेव्हा शहरात पाणी कपात आणि टँकरने पाणी पुरवठा केला जातो, तेव्हा अशा प्रकारच्या गळतीमुळे लाखो लिटर पाणी वाया जाणे हे नागरिकांना पूर्णपणे अक्षम्य वाटत आहे.
नागरिक म्हणतात, “पाणी बचत करण्याचे आवाहन केले जाते, पण प्रशासन स्वतःच लाखो लिटर पाणी वाया घालवत आहे.”
पाणी पुरवठा विभागाने तातडीने जलवाहिनी दुरुस्त करून परिसरातील पाणीपुरवठा सुरळीत करावा आणि रस्त्याचे काम पूर्ण करावे, अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

1 thought on “पुण्यात पाणी कपात, तरीही लाखो लिटर पाणी रस्त्यावर वाहतेय कोंढवा गंगाधाम रोडवर जलवाहिनी फुटली, ४-५ दिवसांपासून दुरुस्तीचा पत्ता नाही

Leave a Reply to Sandra827 Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *