Pune : वाघोलीत एमडी ड्रग्जसह दोघांना अटक; ३१ लाखांचा मुद्देमाल जप्त

 

 

पुणे : एमडी ड्रग्जची विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना वाघोली पोलिसांनी सापळा रचून अटक केली असून, त्यांच्याकडून एकूण ३१ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या कारवाईत योगेश सुभाष कणगरे (वय ३८, रा. शिवकृपा बिल्डिंग, साईनगर, लोहगाव) आणि सोनू सिंह ऊर्फ मनुवेंद्र ऊर्फ सोनू शंकर सिंह (वय ४२, रा. विद्यानगर, गुड विल रेसिडेन्सी, टिंगरेनगर) यांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार आरोपी वाघोली परिसरात एमडी ड्रग्ज विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचत दोघांना ताब्यात घेतले. झडतीदरम्यान त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात एमडी ड्रग्ज आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले.
या प्रकरणी वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींकडून आणखी माहिती मिळवण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

1 thought on “Pune : वाघोलीत एमडी ड्रग्जसह दोघांना अटक; ३१ लाखांचा मुद्देमाल जप्त

Leave a Reply to Wayne2242 Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *