
PCMC Hordings : अनधिकृत जाहिरात फलक धारकांविरोधात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. नुकत्याच केलेल्या शहरातील अनधिकृत जाहिरात फलक सर्वेक्षणात आढळून आलेल्या 24 बेकायदेशीर जाहिरात फलक धारक, जाहिरात धारक तसेच जागा मालक यांच्यावर भारतीय दंड संहिता 1860 अंतर्गत कलम 336, महाराष्ट्र मालमत्ता विरूपणास प्रतिबंध अधिनियम 1995 अंतर्गत कलम 3, महानगरपालिका अधिनियम 1888 अंतर्गत कलम 244 आणि 245 या कलमांतर्गत पिपंरी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जाहिरात फलक धारकांसमवेत झालेल्या बैठकीत आयुक्त शेखर सिंह यांनी अनधिकृत जाहिरात फलक हटविण्यासाठी फलक धारकांना सूचित केले होते. 15 ते 20 मे 2024 या कालावधीत महापालिकेने अनधिकृत जाहिरात फलक सर्वेक्षण केले त्यामध्ये 24 अनधिकृत जाहिरात फलक आढळून आले. महापालिकेने आतापर्यंत केलेल्या निष्कासनाच्या कारवाईमध्ये शहरातील एकूण 20 अनधिकृत जाहिरात फलक हटविण्यात आले आहेत. त्यामध्ये 9 फलक महापालिकेच्या वतीने निष्कासित करण्यात आले असून 11 अनधिकृत फलक स्वत: फलक धारकांच्या वतीने हटविण्यात आले आहेत.
|
Jalgaon Cyber Crime : ईडीच्या कार्यालयातून बोलत असल्याची बतावणी; डॉक्टराची १९ लाखांत फसवणूक |
आयुक्त शेखर सिंह म्हणाले, सर्वेक्षणामध्ये आढळून आलेल्या सर्व अनधिकृत फलक धारकांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून सर्व अनधिकृत फलक निष्कासित करण्याची कारवाई सुरू आहे. महापालिकेच्या वतीने फलक धारकांसाठी नवीन स्ट्रक्चरल ऑडिट फॉरमॅट लागू करण्यात येणार आहे. यामुळे जाहिरात फलक धारक शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करू शकतील आणि सुरक्षित जाहिरात फलक उभारण्याची जबाबदारी टाळू शकणार नाहीत. जाहिरात फलकांचे नियमित सर्वेक्षण आणि अनधिकृत फलकांवर होणारी कारवाई ही निरंतर प्रक्रिया असून ती पुढेही सुरूच राहणार आहे. तशा कारवाई सूचना सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
सह आयुक्त चंद्रकांत इंदलकर म्हणाले, अनधिकृत फलक निष्कासित करणे आणि फलक धारक, जाहिरात धारक तसेच जागा मालकांवर गुन्हा दाखल करणे हे शहरातील नागरी सुव्यवस्था आणि सुरक्षितता टिकवून ठेवण्यासाठी महापालिकेच्या वतीने उचलण्यात आलेले महत्वपुर्ण पाऊल आहे.
24 अनधिकृत जाहिरात फलकांसोबत वाढीव 341 जाहिरात फलकही सर्वेक्षणात आढळून आले आहेत. या जाहिरात फलक धारकांना फलकाचे आकारमान सुधारण्याबाबत नोटीसा देण्याची प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आली असून फलकाचे आकारमान नियमानुसार बदलले नाही तर फलक हटविण्याची कार्यवाही केली जाणार आहे, अशी माहिती उप आयुक्त संदीप खोत यांनी दिली.
दरम्यान, मागील आठवड्यात 16 मे रोजी मोशी येथे होर्डिंग कोसळल्यानंतर महापालिकेच्या वतीने एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात दोन व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
जागा मालक, जाहिरात धारकांनी फलक उभारताना सूचनांचे पालन करावे अन्यथा होणार कायदेशीर कारवाई
जागा मालक, जाहिरात धारक यांनी कोणत्याही खाजगी जागेमध्ये किंवा सार्वजनिक ठिकाणी लोखंडी स्ट्रक्चरवर होर्डिंग बसविताना जाहिरात फलक धारकाच्या हलगर्जीपणामुळे कोणतीही जिवीत किंवा वित्त हानी होणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच जाहिरात धारकाने महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये जाहिरात फलक बसविताना जाहिरात फलक धारकाने आकाशचिन्ह व परवाना विभागाकडून रितसर परवानगी घेतलेली आहे की नाही याची खातरजमा करावी. परवानगी घेतली नसल्यास किंवा नियमांचे उल्लंघन केलेले आढळल्यास संबंधित जाहिरात धारक, जागा मालक तसेच फलक धारकावर कायदेशीर कारवाई केली जाईल.
शहर
- पुणेः पोलीस दलात मोठी खळबळ! औंध परिसरातील राहत्या घरी पोलीस उपनिरीक्षकाने डोक्यात गोळी झाडून संपवले जीवन
- पुणे: अजितदादा खूप मोठ्या मनाचे होते, पण मी दादांसारखी नाही; पुरुषोत्तम जगतापांना लक्ष्य करत सुनेत्रा पवारांचा कडक इशारा!
- नाशिक: प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! १७ ऑक्टोबर रोजी नाशिक-मुंबई रेल्वेसेवेला बसणार मोठा 'ब्रेक'; अनेक गाड्या रद्द किंवा विचलित!
- पुणे: मक्याच्या भाकरीऐवजी मुरघासाला मका; पावसाअभावी पिके करपल्याने इंदापुरातील शेतकऱ्यांचा हटके आणि फायदेशीर हिशेब!
महाराष्ट्र
- पुणेः पोलीस दलात मोठी खळबळ! औंध परिसरातील राहत्या घरी पोलीस उपनिरीक्षकाने डोक्यात गोळी झाडून संपवले जीवन
- वर्धा: 'घरकुल योजनेचा' लाभ न मिळाल्याने थेट नगरपरिषदेत नागरिकाने अंगावर ओतून घेतले रॉकेल!
- परभणी: बळीराज्याला वाऱ्यावर सोडणार नाही, सरकारच्या तिजोरीवर पहिला अधिकार शेतकऱ्यांचाच; परभणीत एकनाथ शिंदेंची ठाम ग्वाही!
- सिंधुदुर्ग: मुसळधार पावसाचे तांडव! कुडाळमध्ये ओहोळात वाहून गेल्याने शेतकऱ्याचा मृत्यू, करूळ घाटात दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प
गुन्हा
- नागपूर: दारूच्या नशेत अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्या पित्याची अल्पवयीन मुलीनेच केली हत्या; एमआयडीसी परिसरातील घटना
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
- पुणे: ऐतिहासिक कसबा गणपती मंदिरात मध्यरात्री चोरी; दानपेटी फोडून ६० हजारांची रोकड लंपास
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: 'इंडिया' आघाडीच्या आंदोलनादरम्यान आकाशवाणी भवनात विनापरवाना प्रवेश; राहुल आणि प्रियंका गांधींव्यतिरिक्त इतर नेत्यांवर गुन्हा दाखल!
- बेंगळुरु: हिंदी शिकत नसाल तर नोकरी सोडून निघून जा; बंगळुरुच्या वेअरहाऊसमध्ये भाषिक वाद विकोपाला, व्यवस्थापकावर गुन्हा दाखल अन् मोठा संताप
- नवी दिल्ली: मोठ्या बंदोबस्तात महिलांशी गैरव्यवहार ; दिल्लीतील 'इंडिया' आघाडीच्या आंदोलनावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांचा सरकारवर गंभीर आरोप
- नवी दिल्ली: हे आपण करून दाखवणारच ; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सार्वजनिक जीवनाची २५ वर्षे पूर्ण, विकसित भारत २०४७' च्या संकल्पावर भर

























Subscribe to my channel




