
Pune : दिवाळीनिमित्त मिठाई, खवा, पनीर, तूप, खाद्यतेलांसह इतर अन्नपदार्थांमध्ये भेसळ होण्याची शक्यता जास्त असते. यामुळे दरवर्षी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाकडून खाद्यपदार्थांची तपासणी करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात येते. यंदा या मोहिमेला खीळ बसली आहे. विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी विधानसभा निवडणुकीच्या कामात व्यग्र असल्याचा फटका या मोहिमेला बसत आहे.
नागरिकांना सकस, भेसळमुक्त व सुरक्षित अन्नपदार्थ उपलब्ध करून देण्याची जबाबदारी अन्न व औषध प्रशासन विभागावर असते. दिवाळीच्या कालावधीत अन्नपदार्थांमध्ये भेसळ होण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे दिवाळीनिमित्त मिठाई, मावा उत्पादक व वितरकांनी ग्राहकांना दर्जेदार ताजी व सकस मिठाईची विक्री करावी. अन्न विषबाधेसारखा अनुचित प्रकार घडू नये, यासाठी विभागाकडून मोहीम हाती घेण्यात येते. यंदा दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक असणारी भेसळ रोखणारी मोहीम राबविण्यात विभागाला अनेक अडचणी येऊ लागल्या आहेत.
यंदा विधानसभा निवडणुकीमुळे विभागातील बहुसंख्य अधिकारी आणि कर्मचारी निवडणुकीच्या कामावर आहेत. यामुळे अन्न व औषध प्रशासन विभागाकडे सध्या पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी निवडणुकीच्या कामाची जबाबदारी सांभाळून भेसळ रोखण्यासाठी मोहीम राबवावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. अधिकारी आणि कर्मचारी एकाच वेळी दोन्ही कामे असे करणार, असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
|
Pandhapur : काॅंग्रेस, शिंदे गट विरोधात धनगर समाज आक्रमक; भंडारा उधळून केला निषेध |
ग्राहकांनी काय काळजी घ्यावी?
ग्राहकांनी अन्नपदार्थाच्या वेष्टनावरील बॅच क्रमांक, लॉट क्रमांक, पदार्थ वापरण्याची मुदत, उत्पादन दिनांक, अन्न नोंदणी क्रमांक, अन्न परवाना क्रमांक आदी तपासूनच तो खरेदी करावा. अन्नपदार्थावर अशी माहिती नसल्यास त्याची खरेदी करणे टाळावे. मिठाई खरेदी केल्यानंतर ती लवकर संपवावी. मिठाई ताजी व सकस आहे याची खात्री करावी. याचबरोबर अन्नपदार्थ खरेदी करताना विक्रेत्याकडून देयक घ्यावे म्हणजे फसवणूक होणार नाही. कोणत्याही अन्नपदार्थाच्या गुणवत्ता व दर्जाबाबत तक्रार असल्यास टोल फ्री क्रमांक १८००२२२३६५ येथे तक्रार नोंदवावी.
उत्पादकांनी याचे पालन करावे…
- अन्नपदार्थ तयार करण्याची जागा स्वच्छ ठेवावी.
- पदार्थ बनविण्यासाठी पिण्यायोग्य पाण्याचा वापर करावा.
- परवानाधारक व्यावसायिकांकडून कच्चा माल खरेदी करावा.
- पदार्थ बनविण्याची भांडी स्वच्छ व झाकणबंद असावीत.
- अन्नपदार्थ स्वच्छ, सुरक्षित ठिकाणी जाळीदार झाकणाने झाकूण ठेवावेत.
- कामगारांना त्वचा व संसर्गजन्य आजार झालेला नसावा.
- कामगारांची वेळोवेळी वैद्यकीय तपासणी करावी
- खाद्यतेलाचा तळण्यासाठी पुनर्वापर करू नये.
अन्न व औषध प्रशासनाचे अनेक अधिकारी आणि कर्मचारी सध्या विधानसभा निवडणुकीच्या कर्तव्यावर आहेत. यामुळे त्यांनी आपली निवडणुकीच्या कामाची जबाबदारी सांभाळून दिवाळीच्या काळात राबविण्यात येणारी भेसळ प्रतिबंधक मोहीम राबवावी, असे निर्देश दिले आहेत.
शहर
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- Pune : पुण्यात पुन्हा GBSचं संकट; 51 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती

























Subscribe to my channel

