
Pune : विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षाची पहिली यादी जाहीर करताना, पक्ष सोडून जाणार असल्याची चर्चा असलेल्या, तसेच पक्षांतर्गत आणि भाजपचा विरोध असलेल्या विद्यमान आमदारांना उमेदवारी देऊन वेगळी खेळी केली आहे. त्याचबरोबर, महायुतीमध्ये वादाच्या ठरलेल्या जागांवरील उमेदवारांची घोषणा न करता त्याबाबत सावध भूमिका घेतली आहे. विद्यमानांना नाराज न करणे आणि त्यांना विरोध असलेल्यांची नंतर समजूत घालणे, अशी रणनीती यात दिसत असून, त्या योगे राष्ट्रवादीचे (अजित पवार) पुणे जिल्ह्यावरील वर्चस्व न गमावण्याचा हेतू असल्याचे म्हटले जाते.
अजित पवार स्वत: बारामती विधानसभा मतदारसंघातून लढणार असून, आंबेगाव येथून दिलीप वळसे-पाटील, खेड-आळंदीमधून दिलीप मोहिते, इंदापूरमधून दत्तात्रय भरणे, पिंपरीतून अण्णा बनसोडे, मावळमधून सुनील शेळके, जुन्नरमधून अतुल बेनके आणि हडपसरमधून चेतन तुपे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.
यातील जुन्नरचे आमदार अतुल बेनके अजित पवार यांची साथ सोडून राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षात जाणार असल्याची चर्चा होती. बेनके यांनी शरद पवार यांची भेटही घेतली होती. मावळ मतदारसंघाचे आमदार सुनील शेळके यांना उमेदवारी देण्याबाबत पक्षातूनच विरोध आहे. त्यातच भाजपनेही पवार यांच्यावर दबाव टाकला होता, तर पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांच्याबाबतही कार्यकर्त्यांची नाराजी होती.
|
|
राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर हडपसर मतदारसंघातील आमदार चेतन तुपे यांनी प्रारंभी ‘तटस्थ’ भूमिका घेतली होती. त्यानंतर त्यांनी अजित पवार यांना पाठिंबा दिला. मात्र, तुपे यांची भूमिका कायमच संदिग्ध राहिली होती. ते शरद पवार यांच्या पक्षात जाणार असल्याची चर्चाही सातत्याने होत होती. असे असूनही या चारही विद्यमानांना पुन्हा संधी मिळाली आहे.
अजित पवार यांचे सहकारी, राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांची कन्या ॲड. पूर्वा यांना संधी दिली जाईल, अशी चर्चा होती. पण, वळसे पाटील यांनाच पुन्हा संधी मिळाल्याने या चर्चेलाही पूर्णविराम मिळाला आहे. स्वत: अजित पवार बारामती मतदारसंघातून निवडणूक लढविणार असून, त्यांच्या विरोधात पुतणे युगेंद्र पवार असण्याची शक्यता आहे.
शिवसेना (शिंदे) पक्ष नाराज
महायुतीच्या जागावाटपात हडपसर विधानसभा मतदारसंघ शिवसेनेला (शिंदे) द्यावा, अशी मागणी करण्यात आली होती. पण, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे हा मतदारसंघ गेल्याने शिवसेनेचे शहरप्रमुख प्रमोद उर्फ नाना भानगिरे नाराज झाले आहेत. त्यामुळे ते मेळावा घेऊन पुढील दिशा निश्चित करणार आहेत.
वडगावशेरी, खडकवासल्याबाबत सावध भूमिका
वडगावशेरी आणि खडकवासला विधानसभा मतदारसंघाबाबत राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये एकमत झालेले नाही. वडगावशेरी मतदारसंघ भाजपला हवा आहे. त्या बदल्यात खडकवासला मतदारसंघ राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाला देण्याची भाजपची तयारी आहे, असे समजते. पण, हा प्रस्ताव अजित पवार यांना अमान्य आहे. शहरातील तीन मतदारसंघांसाठी अजित पवार आग्रही असून, वडगावशेरी आणि खडकवासला मतदारसंघांसाठी त्यांनी जोर लावला आहे. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघांबाबत पवार यांनी सावध भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे.
शहर
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- मुंबई: एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळत सचिव महेंद्र हरपाळकर यांची केली बदली!
महाराष्ट्र
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- बीड: महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का; जळगावमध्ये नेत्यांचा पक्षाला रामराम, तर बीडमध्ये काँग्रेसची ताकद वाढली!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग

























Subscribe to my channel




