Pune News: पुण्यात गणपती विसर्जनाला गालबोट, एकाचवेळी तिघांचा मृत्यू, शवविच्छेदन अहवालात मोठी माहिती समोर येणार

Pune  : राज्यात लाडक्या गणरायाला जल्लोषात 'पुढच्या वर्षी लवकर या' म्हणत निरोप देण्यात आला. अनेक ठिकाणी वाजत गाजत मिरवणुका काढण्यात आल्या. दरम्यान, विसर्जन करतांना २१ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये १ तर नगर जिल्ह्यात २ आणि इंदापूरमध्ये एकाचा बुडून मृत्यू झाला आहे. दरम्यान, पुण्यातील विसर्जन मिरवणुकीदरम्यान तिघांचा आकस्मिक मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष बाब म्हणजे, एकाचवेळी तिघांचा मृत्यू झाला आहे.

पुण्यातील या व्यक्तींचा मृत्यू नेमका कशामुळे झाला आहे? हे आता शवविच्छेदन अहवालातून समोर येणार आहे. यासंदर्भात ससून रुग्णालयाने माहिती दिली आहे. नयन ढोके (वय २७), विशाल बल्लाळ (वय ३५) आणि अन्य एक ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. लक्ष्मी रोड, टिळक रोड आणि एकाचा कसबा गणपती मंडळाजवळ मृत्यू झाला आहे. तिघांच्या मृतदेहांचे ससून रुग्णालयामध्ये शवविच्छेदन केले असून काही वेळामध्ये त्यांचा अहवाल समोर येणार आहे. त्यापुढे त्यांचा मृत्यू कसा झाला हे स्पष्ट होईल.

Pune crime : पत्नीचे बॉयफ्रेंडसोबतचे फोटो व्हायरल; शिक्षक पतीला राग अनावर, बिहारी मित्राच्या मदतीने त्याचा काटा काढला

मिरवणुकीदरम्यान तीन जणांचा मृत्यू

गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान तीन जणांचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत. धुळे शहराला लागून असलेल्या चित्तोड गावात मिरवणूक सुरू असताना ही दुर्घटना घडली आहे. एकलव्य मित्र मंडळाच्या वतीने विसर्जन मिरवणूक काढण्यात आली होती. मिरवणूक सुरू असताना एका ठिकाणी थांबून सर्व कार्यकर्ते नाचत होते.

दोन सख्ख्या भावांचा मृत्यू

दरम्यान, उत्तर महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यात दोन सख्ख्या भावांचा देखील विसर्जनाच्यावेळी बुडून मृत्यू झाला. एकाच घरातील दोघे सख्खे भाऊ गणपती विसर्जनासाठी गेले असता तलावाच्या पाण्याचा अंदाज न आल्यामुळे या दोघेही भावांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यांच्यासह आणखी एक मित्र विसर्जनासाठी गेला होता. परंतु तो मात्र सुदैवाने बचावला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात एकच शोककळा पसरली आहे.

ओम पाटील आणि यश पाटील या दोन्ही सख्ख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. धुळे शहरातील बिलाडी परिसरामध्ये असलेल्या वारे नगर येथील हे दोघेही भावंड असून, गणपती विसर्जनासाठी ते परिसरातील तलावात गेले असता त्यादरम्यान ही दुर्दैवी घटना घडली आहे. तलावातील खोलीचा अंदाज न आल्यामुळे या दोघेही सख्ख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply