
पुणे - निवासी मिळकतींसाठी दिली जाणारी 40 टक्के सवलत कायम ठेवण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला, मात्र राज्य मंत्रीमंडळामध्ये अद्यापही त्याबाबत निर्णय न झाल्याने अखेर पुणे महापालिकेने 2023-24 या वर्षातील मिळकत कराच्या बिलांचे वाटप मंत्रीमंडळाच्या निर्णयानंतर घेण्याचे निश्चित केले आहे. मिळकत कराच्या बिलांचे वाटप 1 मे पासून केले जाणार आहे, तसेच पालकमंत्र्यांच्या आदेशानुसार 40 टक्के सवलत काढल्यानंतर आकारलेल्या मिळकतींची बिले भरण्यासही 30 एप्रिलपर्यत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे एप्रिल महिन्यात थकबाकीदारांकडून दंडाची आकारणी केली जाणार नसल्याचे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी शुक्रवारी स्पष्ट केले.
महापालिकेकडून नागरीकांना नव्या आर्थिक वर्षात मिळकत कराच्या बिलांचे वाटप केले जाते. महापालिकेकडून नागरीकांना त्यांच्या निवासी मिळकतीवर मिळकतकराच्या 40 टक्के सवलत दिली जात होती. त्यामुळे महापालिकेचे आर्थिक नुकसान होत असल्याची नोंद महालेखा परीक्षकांच्या (कॅग) नोंदविल्यानंतर हि सवलत बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने 2019 मध्ये घेतला. त्यामुळे 1 लाख 65 हजार मिळकतधारकांकडून 100 टक्के दराने कर आकारणी केली जात होती. हि सवलत रद्द झाल्याने नागरीकांनी त्यास मोठ्या प्रमाणात विरोध दर्शविला. त्याची सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी दखल घेत राज्य सरकारपुढे सवलत पुर्ववत ठेवण्याची मागणी केली होती. दरम्यान, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही सप्टेंबर महिन्यात नागरीकांनी हि बिले भरु नयेत, असे आवाहन केले होते.
दरम्यान, अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईत बैठक झाली. त्यामध्ये 40 टक्के कर सवलत पुर्ववत करण्याचे निश्चित झाले. मुख्यमंत्री शिंदे यांनी त्याची घोषणाही केली. मात्र त्यानंतर मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय होऊन राज्य सरकाकडून त्याविषयी आदेश निघणे अपेक्षित होते.
मात्र अजूनही राज्य सरकारने त्याबाबत कुठलाही निर्णय न घेतल्याने नागरीकांमध्ये संभ्रम होता. त्यातच नव्या आर्थिक वर्षानुसार महापालिकेकडून 1 एप्रिलपासूनच नागरीकांना मिळकत कराची बिले पाठविण्यास सुरुवात होते. मात्र 40 टक्के कर सवलतीबाबतचा निर्णय न झाल्याने महापालिका प्रशासनाचीही अडचण झाली होती. याबाबतचा निर्णय आगामी काही दिवसात होईल, अशी शक्यता लक्षात घेऊन महापालिकेने 2023-24 या वर्षाच्या मिळकत कराच्या बिलांचे वाटप 1 मेपासून करण्याचा निर्णय घेतला आहे.
'राज्य सरकारने 40 टक्के मिळकत कर सवलतीबाबत निर्णय घेतल्यानंतर नागरीकांना दुरूस्तीसह बिले द्यावी लागतील, अन्यथा गोंधळ निर्माण होईल. राज्य सरकार 40 टक्के कर सवलत नेमकी केव्हापासून करणार यावरही नवीन बिलांची छपाई अवलंबून आहे. त्यामुळे सध्या तरी पुढील वर्षाच्या बिलांचे वाटप 1 मे पासून होईल. तसेच महापालिका 31 मे पर्यंत मिळकत कर भरणाऱ्यांना सर्वसाधारण करामध्ये 5 टक्के सवलत देते. त्याचीही मुदत 30 जूनपर्यंत वाढविण्यात आली आहे. 40 टक्के सवलत काढल्यामुळे ज्या मिळकत धारकांना अधिकची बिले आली आहेत व ज्यांनी ती भरलेली नाहीत, त्यानांही ही बिले भरण्यासाठी 30 एप्रिलपर्यंत मुदत वाढ देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.'
- विक्रम कुमार, आयुक्त, महापालिका.
शहर
- बारामती: पुण्यात भीषण अपघातात बोडरे कुटुंबातील तीनही भावंडांचा दुर्दैवी अंत
- पुणे: नवले ब्रिजवर भरधाव सिमेंट टँकर पलटी झाल्याने दुचाकीस्वाराचा चिरडून मृत्यू.
- मुंबईत सरकारचा मोठा दणका! १९,७३४ जन्म दाखल्यांमधील बेकायदेशीर दुरुस्त्या रद्द होणार; मूळ नोंदी पुनर्संचयित करण्याचे आदेश!
- बारामती तालुक्यात जलक्रांती! सुनेत्रा पवार यांच्या पुढाकाराने खांडज येथील बेंदचारीच्या खोलीकरण व रुंदीकरण कामाला जोरदार प्रारंभ; शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण!
महाराष्ट्र
- बारामती: पुण्यात भीषण अपघातात बोडरे कुटुंबातील तीनही भावंडांचा दुर्दैवी अंत
- भंडारा: वासनांधांचा नकार देणाऱ्या अल्पवयीन मुलीला ब्लॅकमेल; आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल केल्याने खळबळ
- अमरावती: 'बोगस' जन्मप्रमाणपत्रांचा मोठा स्फोट; तब्बल ४० हजार संशयास्पद नोंदी उघड!
- पुणे: नवले ब्रिजवर भरधाव सिमेंट टँकर पलटी झाल्याने दुचाकीस्वाराचा चिरडून मृत्यू.
गुन्हा
- अमरावती: 'बोगस' जन्मप्रमाणपत्रांचा मोठा स्फोट; तब्बल ४० हजार संशयास्पद नोंदी उघड!
- पुणे: आर्मीच्या सुभेदाराला दोन कोटींचा गंडा! प्रसिद्ध सीए दाम्पत्यासह पाच जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल.
- महाराष्ट्र: पुणे मनपा, विधान भवन आणि आरएसएस मुख्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 'खलिस्तान नॅशनल आर्मी'च्या नावाने आला ईमेल.
- पनवेल: लग्नाच्या तगाद्यातून प्रेयसीची हत्या करून मृतदेह जाळला; दोन महिन्यांनी प्रियकर अटकेत.
राजकीय
- कर्नाटकच्या राजकारणात मोठा भूकंप! डी. के. शिवकुमार मुख्यमंत्री होताच पक्षात बंडाळी; असंतुष्ट नेते दिल्लीला रवाना
- कोल्हापुरात 'शक्तीपीठ महामार्गा'वरून राजकीय ठिणगी; सतेज पाटील आणि राजेश क्षीरसागर आमनेसामने!
- तृणमूल काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप; २० खासदार 'नॉट रिचेबल', गुप्त बैठका आणि संभाव्य फुटीच्या चर्चांनी ममता बॅनर्जींची चिंता वाढली.
- पंजाब भाजपमध्ये मोठी खळबळ; प्रदेशाध्यक्षपदी के.एस. ढिल्लों यांच्या नियुक्तीनंतर सरचिटणीस डॉ. जगमोहन सिंग राजू यांचा राजीनामा.
इतर
- एफडी (FD) धारकांसाठी मोठी बातमी! आता बँकांना दररोज जाहीर करावे लागणार व्याजदर; आरबीआयचा पारदर्शकतेवर भर
- आजचे राशीभविष्य: मंगळाच्या कृपेने या राशींना होणार धनलाभ, मालमत्ता खरेदीचे योग!
- एसटीचा प्रवास आता अधिक हायटेक! सवलतीसाठी 'एनसीएमसी' स्मार्ट कार्ड अनिवार्य, तर बसस्थानकांच्या २०० मीटर परिसरात अवैध वाहतुकीवर बंदी!
- रोज सकाळी जिरे पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर की अपायकारक? डॉक्टरांनी सांगितली सत्यता.
मनोरंजन
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
देश विदेश
- लंडन: मराठी कुटुंबावर काळाचा घाला; 'एलिफंट अँड कॅसल' येथील ३६ व्या मजल्यावरून पडून दाम्पत्यासह नऊ वर्षांच्या मुलाचा मृत्यू.
- महाराष्ट्र: पुणे मनपा, विधान भवन आणि आरएसएस मुख्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 'खलिस्तान नॅशनल आर्मी'च्या नावाने आला ईमेल.
- ओमान-गुजरात सब-सी गॅस पाइपलाइन: होर्मुझवरील अवलंबित्व संपवून भारताची ऊर्जा सुरक्षा बळकट करणारा एक ऐतिहासिक प्रकल्प!
- लग्नापूर्वीचे शारीरिक संबंध म्हणजे चारित्र्यावर डाग नव्हे; सर्वोच्च न्यायालयाची अत्यंत महत्त्वपूर्ण टिप्पणी!

























Subscribe to my channel



