पुणे : जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची मूर्ती आणि शिळा मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यासाठी पंतप्रधान मोदी देहूत येणार

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी १४ जून रोजी देहूत येणार आहेत. त्यांच्या हस्ते जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या मूर्तीचा, शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा होणार आहे.

ज्या सभा मंडपातून नरेंद्र मोदी हे वारकऱ्यांना संबोधित करणार आहेत त्या सभा मंडपाचे भूमिपूजन आज करण्यात आलं आहे. राम मंदिराचे कोषाध्यक्ष गोविंद गिरी महाराज, ह.भ.प कुरेकर महाराज यांच्या उपस्थितीत हे भूमिपूजन करण्यात आलं.

लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमास महाराष्ट्रातील वारकरी, दिंड्या उपस्थित राहणार आहेत. जवळपास ३०- ४० हजार जणांचा समुदाय कार्यक्रमास येणार असल्याचे विश्वस्त संजय महाराज मोरे यांनी सांगितलं आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *