
हिंगोली: कायद्याचे रक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्यावरच कायदा मोडल्याचा गंभीर आरोप झाला आहे. नांदेड पोलीस दलात कार्यरत असलेले प्रशांत गजभारे यांनी पहिली पत्नी जिवंत असताना आणि कायदेशीर घटस्फोट न घेता दुसरा विवाह करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे, हे लग्न थांबवण्यासाठी मंडपात आलेल्या पहिल्या पत्नीला त्यांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
माहितीनुसार, प्रशांत गजभारे आणि शारदा गजभारे यांचा २०२२ मध्ये प्रेमविवाह झाला होता. त्यांना दोन वर्षांची मुलगी आहे. कौटुंबिक वाद सुरू असतानाच ५ जुलै रोजी फेसबुकवर पतीच्या दुसऱ्या लग्नाचे फोटो पाहून शारदा गजभारे यांना या विवाहाची माहिती मिळाली. त्यानंतर त्या आपल्या नातेवाईकांसह वसमत येथील कृष्ण मंगल कार्यालयात पोहोचल्या आणि विवाह थांबवण्याचा प्रयत्न केला. यावेळी आरोपीने त्यांच्यावर मारहाण केल्याचा तसेच गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या घटनेत शारदा गजभारे यांच्या हाताला दुखापत झाली असून त्यांनी वसमत शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून प्रशांत गजभारे यांच्यासह इतर १२ जणांविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत असून संबंधित आरोपींविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू आहे.
शहर
- मुंबई: "पक्षप्रमुखांचा निर्णय म्हणजे राजकीय पक्षाची इच्छा नाही, असे कसे?"; कपिल सिब्बलांचा सर्वोच्च न्यायालयात थेट सवाल.
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्यात पावसाचा सलग १७ दिवसांचा खंड; खरीप पिके करपण्याच्या वाटेवर, शेतकरी चिंतेत!
- पुणे: फुटपाथ नाही, प्रचंड वाहतूक कोंडी; राजकारण बाजूला ठेवून प्रशासनाने चाकण-हिंजवडीकडे लक्ष द्यावे, आदित्य ठाकरेंची मागणी
- नागपूर: ८६ हजार कोटींपेक्षा अधिक रकमेची कंत्राटदारांची देयके रखडली; १८ आणि १९ ऑगस्ट रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर धरणे व तीव्र आंदोलन
महाराष्ट्र
- मुंबई: "पक्षप्रमुखांचा निर्णय म्हणजे राजकीय पक्षाची इच्छा नाही, असे कसे?"; कपिल सिब्बलांचा सर्वोच्च न्यायालयात थेट सवाल.
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्यात पावसाचा सलग १७ दिवसांचा खंड; खरीप पिके करपण्याच्या वाटेवर, शेतकरी चिंतेत!
- पुणे: फुटपाथ नाही, प्रचंड वाहतूक कोंडी; राजकारण बाजूला ठेवून प्रशासनाने चाकण-हिंजवडीकडे लक्ष द्यावे, आदित्य ठाकरेंची मागणी
- नागपूर: ८६ हजार कोटींपेक्षा अधिक रकमेची कंत्राटदारांची देयके रखडली; १८ आणि १९ ऑगस्ट रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर धरणे व तीव्र आंदोलन
गुन्हा
- कचरा वादातून अमानुष हत्या! कुपवाडमध्ये केसरेकर दाम्पत्याचा मृत्यू, हातोडी-चाकूच्या हल्ल्याने सांगली हादरली
- बंगळुरू: कौटुंबिक वादाचे भयानक पर्यवसान; पतीने मारहाण करत पत्नीचा घातला सालेाखा, त्यानंतर स्वतःही संपवले जीवन
- पुणे: भोंदू बाबाचे किळसवाणे कृत्य! दैवी शक्तीच्या नावाखाली अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण; 'गुरुवर्य' स्वप्नील लांडेवर गुन्हा दाखल
- नाशिक: केमिकल वापरून बनवल्या जात होत्या बनावट नोटा; त्र्यंबकेश्वर मार्गावरील बंगल्यावर पोलिसांचा छापा
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: फाशीऐवजी विषारी इंजेक्शन देण्याची मागणी; मृत्युदंडाच्या शिक्षेवर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निकाल
- अयोध्या: राम मंदिर दान चोरी प्रकरण एसआयटीचा अंतिम अहवाल सादर, माजी पदाधिकारी चंपत राय आणि अनिल मिश्रा यांना क्लीन चिट
- बंगळुरू: कौटुंबिक वादाचे भयानक पर्यवसान; पतीने मारहाण करत पत्नीचा घातला सालेाखा, त्यानंतर स्वतःही संपवले जीवन
- बिहार: गर्दीत अडकलेल्या कॉन्स्टेबलने आत्मरक्षणासाठी AK-47 मधून गोळ्या झाडल्या; सिवान गोळीबार प्रकरणात बिहार सरकारचे सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र

























Subscribe to my channel



