Pervez Musharraf passes away : पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांचं निधन!

Pervez Musharraf passes away : पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांचे दुखःद निधन झाल्याची बातमी सध्या समोर येत आहे. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. दुबईमध्ये रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पाकिस्तानच्या माध्यमांमधून ही मोठी बातमी समोर आली आहे. 

आजारापणामुळे त्यांना काही आठवड्यापुर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मुशर्रफ 2016 पासून दुबईत राहत आहेत. तसेच त्यांच्यावर गेल्या आठ वर्षांपासून युएईमध्ये वैद्यकीय उपचार सुरु होते

समोर आलेल्या माहितीनुसार, माजी लष्करप्रमुख आणि पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांचे रविवारी दीर्घ आजाराने UAE मधील अमेरिकन रुग्णालयात निधन झाले, असे वृत्त दैनिक पाकिस्तानने दिले आहे. ते अ‍ॅमायलॉयडोसिस या आजाराने ग्रस्त होते.

त्यांनी 1998 ते 2001 पर्यंत पाकिस्तानचे 10 वे अध्यक्ष जॉइंट चीफ ऑफ स्टाफ कमिटी (CJCSC) आणि 1998 ते 2007 पर्यंत 7 वे सर्वोच्च जनरल म्हणून काम केलेपाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. पाकिस्तानच्या इतिहासात पहिल्यांदाच माजी राष्ट्राध्यक्षांना अशी शिक्षा सुनावण्यात आली होती. पेशावर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश वकार अहमद सेठ यांच्या अध्यक्षतेखालील विशेष न्यायालयाच्या तीन सदस्यीय खंडपीठानं फाशीची शिक्षा सुनावली होती

परवेज मुशर्रफ यांच्यावर देशद्रोहाचाही गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुशर्रफ यांच्यावर डिसेंबर 2013 मध्ये 3 नोव्हेंबर 2007 रोजी देशात आणीबाणी लागू केल्याबद्दल आणि डिसेंबर 2007 च्या मध्यापर्यंत राज्यघटना निलंबित केल्याचा आरोप होता. याप्रकरणी त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

31 मार्च 2014 रोजी मुशर्रफ यांना दोषी ठरवण्यात आले होते. मुशर्रफ यांनी 1999 ते 2008 या कालावधीत त्यांनी पाकिस्तानचे लष्कर प्रमुख म्हणून कारभार सांभाळला



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply