आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत आतापर्यंत इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. तर उपांत्य फेरीत पोहचणारा तिसरा संघ कोणता असणार? हे थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे. इंग्लंडने शुक्रवारी 27 फेब्रुवारीला न्यूझीलंडला पराभूत केलं. त्यामुळे न्यूझीलंडच्या सेमी फायनलच्या मोहिमेला झटका बसला. तर पाकिस्तानचं आव्हान कायम राहिलं. आता शनिवारी पल्लेकेले आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये पाकिस्तानने सुपर 8 मधील आपल्या तिसऱ्या आणि करो या मरो सामन्यात यजमान श्रीलंकेसमोर 213 धावांचं आव्हान ठेवलं आहे. पाकिस्तानने 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 212 धावा केल्या आहेत. त्यामुळे आता पाकिस्तान सेमी फायनलमध्ये पोहचायचं असेल तर श्रीलंकेला 147 धावांपर्यंत रोखावं लागणार आहे. न्यूझीलंडच्या खात्यात 3 गुण आहेत. तर न्यूझीलंडचा नेट रनरेट हा +1.390 असा आहे. त्यामुळे पाकिस्तानला सेमी फायनलचं तिकीट मिळवण्यासाठी नेट रनरेटचं समीकरण जुळवावं लागणार आहे. पाकिस्तानने आता 212 धावा केल्या आहेत. त्यामुळे श्रीलंकेला 147 धावांच्या आत रोखलं तर पाकिस्तानच नेट रनरेट हा न्यूझीलंडपेक्षा जास्त होईल. पाकिस्तान अशाप्रकारे 3 गुणांसह उपांत्य फेरीत पोहचेल. तर न्यूझीलंडचं आव्हान संपुष्टात येईल. मात्र तसं झालं नाही तर पाकिस्तानचा जिंकूनही काहीच फायदा होणार नाही. श्रीलंकेने 148 धावा केल्या तर न्यूझीलंडचा सेमी फायनलमध्ये प्रवेश निश्चित होईल. त्यामुळे श्रीलंकेने 148 धावा कराव्यात, अशी पार्थना न्यूझीलंडचे खेळाडू करत असतील. तर इथे पाकिस्तानच्या गोलंदाजांचा श्रीलंकेला 147 रन्सआधी रोखायचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे आता या सामन्याचा काय निकाल लागतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पाकिस्तानची बॅटिंग श्रीलंकेने टॉस जिंकून पाकिस्तानला बॅटिंगसाठी भाग पाडलं. पाकिस्तानसाठी फखर झमान आणि साहिबजादा फरहान या दोघांनी 176 धावांची सलामी भागीदारी केली. फखर आऊट झाल्याने ही जोडी फुटली. फखरने 84 रन्स केल्या. तर साहिबजादा फरहान याने शतक झळकावलं. साहिबदाजा 100 धावा करुन आऊट झाला. पाकिस्तानच्या सलामी जोडीने कडक सुरुवात दिली. मात्र त्यानंतर पाकिस्तानच्या फलंदाजांनी मोठी धावसंख्या करुन सामन्यावर घट्ट पकड मिळवायची संधी गमावली. श्रीलंकेने पाकिस्तानला शेवटच्या 12 चेंडूत 14 धावांच्या मोबदल्यात 6 झटके दिले. त्यामुळे पाकिस्तानला श्रीलंकेसमोर 8 विकेट्स गमावून 212 धावाच करता आल्या. आता या सामन्याचा काय निकाल लागतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: तुकाराम मुंढेंच्या एफडीए पथकाची मोठी कारवाई; अन्न सुरक्षेचे उल्लंघन व अस्वच्छतेमुळे १६ आस्थापनांचे परवाने निलंबित
- मुंबई: गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या पिलर उभारणीचे काम मध्यरात्री सुरू; आवाजामुळे न्यू दिंडोशीतील रहिवाशांची झोपमोड, नागरिक त्रस्त
- नाशिक: विदर्भ प्रवासाला मोठे बूस्टर नाशिक-बडनेरा मेमूचा 'स्पेशल' टॅग हटला; आता १५ ऑगस्टपासून नियमितपणे दररोज धावणार
- छत्रपती संभाजीनगर: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली ताप १०२ अंशांवर पोहोचला असून टायफॉइडची लक्षणे, रुग्णालयात दाखल
महाराष्ट्र
- सांगली: नागपंचमी २०२६ शिराळ्यात होणार ४१ नागांचे जिवंत दर्शन; वन्यजीव विभागाकडून कडक अटी व शर्तींवर परवानगी मंजूर
- पुणे: तुकाराम मुंढेंच्या एफडीए पथकाची मोठी कारवाई; अन्न सुरक्षेचे उल्लंघन व अस्वच्छतेमुळे १६ आस्थापनांचे परवाने निलंबित
- मुंबई: गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या पिलर उभारणीचे काम मध्यरात्री सुरू; आवाजामुळे न्यू दिंडोशीतील रहिवाशांची झोपमोड, नागरिक त्रस्त
- नाशिक: विदर्भ प्रवासाला मोठे बूस्टर नाशिक-बडनेरा मेमूचा 'स्पेशल' टॅग हटला; आता १५ ऑगस्टपासून नियमितपणे दररोज धावणार
गुन्हा
- नाशिक: केमिकल वापरून बनवल्या जात होत्या बनावट नोटा; त्र्यंबकेश्वर मार्गावरील बंगल्यावर पोलिसांचा छापा
- कोल्हापूर: वीजचोरीचा मोठा भांडाफोड शिरोळमध्ये स्मार्ट मीटरमध्ये फेरफार करून ९ लाखांची चोरी; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल!
- सांगली: "मेस बदलली म्हणून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण; विटा येथील 'गुरुकुल'मधील प्रकाराने खळबळ."
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

नांदेडमध्ये तृतीयपंथीयांच्या दोन गटांत जोरदार हाणामारी; व्हिडिओ व्हायरल
हरिद्वारमध्ये ‘रोड रेज’; हळू चालवण्यास सांगितल्याने थार चालकाचा संताप, बसचालकाला धडक
क्रोएशियाच्या ओमीशमध्ये भीषण वणवा; आगीच्या ज्वाळांनी आकाश लाल, हजारो नागरिकांचे स्थलांतर
देश विदेश
- झारखंड: रांचीमध्ये तिरंगा यात्रेत सहभागी होण्यापासून रोखत पोलीस प्रशासनाकडून धक्काबुक्की; जेएलकेएम नेते देवेंद्र नाथ महतो यांचा गंभीर आरोप
- मध्य प्रदेश: "आता देशासाठी जीव देणार नाही, तर देशद्रोह्यांचा जीव घेऊ"; ८० व्या स्वातंत्र्यदिनी बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचे अत्यंत आक्रमक विधान
- जम्मू-काश्मीर: किश्तवाड येथे महिंद्रा स्कॉर्पियो कार अनियंत्रित होऊन चिनाब नदीत कोसळली, ५ जणांचा मृत्यू
- गोवा: मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची मोठी घोषणा; विकसित गोवा २०३७' चा रोडमॅप जाहीर, रोजगार पायाभूत सुविधा आणि पर्यटनावर विशेष भर


























Subscribe to my channel




