Operation Sindoor : एलओसीवर पाकड्यांचा नापाक गोळीबार, १३ नागरिक ठार, भारताकडून सीमाभागातील गावांचे स्थलांतर सुरू

Operation Sindoor : भारताने पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांचा खात्मा करूम पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला. भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानच्या कुरापती काही थांबायचे नाव घेईनात. पाकिस्तानी सैन्याकडून एलओसीवर सतत गोळीबार केला जातोय. पाकिस्तानकडून २००३ च्या युद्धकराराचे उल्लघंन केलेय. पाकिस्तानी सैन्याने केलेल्या गोळीबारत १३ भारतीयांचा मृत्यू झालाय. पाकिस्तानच्या हल्ल्याला भारताकडूनही जशास तसे प्रत्युत्तर दिले जातेय. यामुळे भारत-पाकिस्तान सीमेवर तणाव वाढला आहे. भारताने सीमाभागातील लोकांचे स्थलांतर केलेय, त्याशिवाय जम्मू आणि राजस्थानमधील सीमालगत असणाऱ्या गावातील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.

भारतीय हवाई दलाने मंगळवारी रात्री पाकिस्तानमधील ९ दहशतवादी तळांना नष्ट केले. भारतीय हवाई दलावे २५ मिनिटात जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तोयबा आणि हिजबुल मुजाहिदीनच्या तळावर हल्ला केला. भारताने केलेल्या या हल्ल्यांमुळे पाकिस्तान बिथरलेय. पाकिस्तानी सैन्यांकडून नियंत्रण रेषेवर (एलओसी) पुंछ, राजौरी, बारामुल्ला आणि कुपवाडा येथे गोळीबार आणि मोर्टार हल्ले तीव्र केले जात आहे. या हल्ल्यांमध्ये १३ नागरिकांचा मृत्यू झाला, तर ५० हून अधिक जण जखमी झाले. पुंछमध्ये भारतीय लष्कराचा जवान दिनेश कुमार शर्मा शहीद झाला.

Nandurbar : गावात पाण्याची मदार एकाच हातपंपावर; दोन दिवसांपासून वीज नसल्याने समस्या बिकट

नियंत्रण रेषेवर (एलओसी) पाकिस्तानने युद्धबंदी कराराचे उल्लंघन करून केलेल्या गोळीबारात १३ निरपराध नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर ५९ जण जखमी झाले. यापैकी ४४ जण एकट्या पुंछमधील आहेत. पाकिस्तानच्या हल्ल्याला भारतीय जवानाकडून चोख प्रत्युत्तर देण्यात येत आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हल्ला-प्रतिहल्ला वारंवार होत आहे. सीमावर्ती गावांमध्ये भीतीचे वातावरण आहे. जम्मूच्या जोरियन गावातील रहिवासी लियाकत अली यांनी सांगितले की, त्यांना आर.एस. पुरा येथील आयटीआय कॉलेजमध्ये स्थलांतरित होण्यास सांगितले आहे. सरकारने तिथे राहण्याची व्यवस्था केली आहे. भारतीय लष्कराने पाकिस्तानला कडक इशारा देताना म्हटले की, कोणत्याही आगळीकीला तितक्याच ताकदीने प्रत्युत्तर दिले जाईल.

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply