Nashik Ganesh Visarjan : नाशिकच्या गणेश विसर्जनाला गालबोट; गोदावरीत २ तर वालदेवी धरणात ३ जण बुडाले

Nashik Ganesh Visarjan : पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत नाशिककारांनी गणपती बाप्पाला निरोप दिला. परंतु या विसर्जन मिरवणुकीला दुर्घटनांचं गालबोट लागलंय. गणपतीचं विसर्जन करताना गोदावरी नदीमध्ये दोन जण बुडाले आहेत. तर वालदेव धरणात तीन बुडल्यांची घटना घडलीय. दरम्यान पालिकेचे जीवरक्षक कर्मचारी यांच्याकडून शोध सुरू आहे. अद्याप त्यांचा शोध लागला नाहीये. मिळालेल्या माहितीनुसार, वालदेवी धरणात २ महाविद्यालयीन युवकासह एक विवाहित तरुण बुडाल्याचं सांगण्यात येत आहे.

नवव्या दिवशीच्या गणपती बाप्पाला निरोप देताना जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील शिरवाडे वणी येथील एक युवक पाण्यात वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली. शिरवाडे वणीगावाजवळील पाचोरे वणी येथील नेत्रावती नदीत काल सायंकाळी तीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच चांदोरी व पिंपळगाव अग्निशमन दलाच्या जवानांचे पथक घटनास्थळी दाखल झाले.

Maharashtra Rain Update : बाप्पाच्या विसर्जनाला 'वरुणराजा'ची हजेरी; मुंबई-पुण्यात मुसळधार पाऊस,

रात्री उशिरापर्यंत बेपत्ता युवकाचा शोध घेतला जात होता, मात्र पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने युवकाचा शोध लागला नाही.दरम्यान भद्रकाली परिसरात मिरवणूक चालू असताना अचानक दोन तरुणांची हाणामारी झाली. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या आणि मिरवणूक पाहायला आलेल्या या दोघांमध्ये तुफान राडा झाला. काही वेळात एकमेकांची डोकीही फोडली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत दोघांनाही ताब्यात घेतले. यात एकजण गंभीर असल्याने त्याला पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply