
Maharashtra Rain Update : मुंबईसह राज्यात अनंत चतुर्दशीच्या मुहूर्तावर गणेशभक्तांकडून लाडक्या गणरायाचं विसर्जन करण्यात येत आहे. राज्यातील जवळपास सर्वच गणेश मंडळाच्या थाटामाटात गणेश विसर्जन मिरवणुका सुरू आहेत. मुंबई आणि पुण्यात एकीकडे गणपती विसर्जनाचा जल्लोष पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे बाप्पाच्या विसर्जनाला वरुणराजाने राज्यात सर्वदूर हजेरी लावली आहे. मुसळधार पावसामुळे मुंबईत भरदुपारीच अंधार पाहायला मिळाला.
मुंबईत विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला देखील सुरुवात झाली आहे. मुंबईच्या पश्चिम उपनगरातील सांताक्रुज, विलेपार्ले, अंधेरी, वर्सोवा, गोरेगाव या भागात पावसाने हजेरी लावली. मुंबईसह पुण्यातही पावसाने दमदार हजेरी लावली आहे.
|
|
राज्यात ठिकठिकाणी विसर्जन मिरवणुकीत असलेल्या भाविकांमध्ये पावसातही उत्साह पाहायला मिळत आहे. या पावसातही गणेश विसर्जन पाहण्यसाठी लोकांची गर्दी पाहायला मिळत आहे.
मुंबई-पुणे या शहरांसह कोल्हापूर आणि लातूरमध्येही पावसाने हजेरी लावली आहे. लातूर जिल्ह्यातील अनेक भागात आज सायंकाळी विजांच्या कडकडाटसह तुफान पाऊस बरसला आहे. तर या पावसातही विसर्जन मिरवणुका सुरू आहेत तर शहरातील सखल भागात पावसाचं पाणी साचलं होतं. पावसाचे पाणी रस्त्यावर आल्याने वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाल्याचेही पाहायला मिळाले. तत्पूर्वी, हवामान खात्याने मुंबईसह मुंबईसह उपनगरांना पुढील ४ तास महत्वाचे असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान विभागाने मुंबई, ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
शहर
- पुणे: अंगावर पेट्रोल ओतून जिवंत मारण्याच्या गंभीर प्रकरणातील आरोपीला उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा; जामीन मंजूर
- पुणे: अल्पवयीन नात घरात एकटी दिसली अन्...; इंदापूर तालुक्यात ६७ वर्षीय आजोबाचे संतापजनक कृत्य, पोलिसांनी केली अटक
- मुंबई: शेतकऱ्यांचा संताप आणि पेच: शासकीय योजनांसाठी आयटीआर सक्तीची अट अन् कर्जमाफीचा प्रश्न; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
- पुणे: भारत आता मार खाणारा देश राहिलेला नाही, गरज पडल्यास घरात घुसून मारणारा देश बनलाय - देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र
- जळगाव : मासे पकडण्याची हौस पडली भारी; जळगावच्या धरणगाव तालुक्यात नदीच्या पात्रात पुराच्या पाण्यात अडकला तरुण, पाच तास काढले झाडावर
- पुणे: अंगावर पेट्रोल ओतून जिवंत मारण्याच्या गंभीर प्रकरणातील आरोपीला उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा; जामीन मंजूर
- पुणे: अल्पवयीन नात घरात एकटी दिसली अन्...; इंदापूर तालुक्यात ६७ वर्षीय आजोबाचे संतापजनक कृत्य, पोलिसांनी केली अटक
- मुंबई: शेतकऱ्यांचा संताप आणि पेच: शासकीय योजनांसाठी आयटीआर सक्तीची अट अन् कर्जमाफीचा प्रश्न; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
गुन्हा
- ठाणे: उल्हासनगरमध्ये सायबर फसवणूक; लंडनच्या डॉक्टर मित्राकडून २५ हजार पाउंड्सचे आमिष दाखवून महिला डॉक्टरला २ लाखांना गंडा
- वाशिम: अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीची पत्नी आणि प्रियकराकडून निर्घृण हत्या; दारू पाजून दोरीने गळा आवळत केला गेम
- ठाणे: डोंबिवलीत संतापजनक प्रकार; नोकरीचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर तिघा नराधमांकडून अत्याचार; मानपाडा पोलिसांकडून आरोपी जेरबंद
- नागपुर: विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या संघात निवड न झाल्याने १७ वर्षीय महिला क्रिकेटपटूचे टोकाचे पाऊल
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
- आजचे राशिभविष्य ३० जुलै २०२६: या राशींच्या कुंडलीतील ग्रह मजबूत, स्वामींची साथ मिळणार तर काहींचे वाढणार टेन्शन
- आजचे राशिभविष्य २९ जुलै २०२६: गणपती बाप्पाच्या कृपेने ‘या’ राशींना मिळणार नवीन नोकरी आणि आनंदाची बातमी
- आजचे राशिभविष्य २७ जुलै २०२६ : या राशींना नोकरीत प्रमोशन तर काही राशींना व्यवहारात सतर्क राहण्याचा इशारा, जाणून घ्या आजचे भविष्य
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- गोवा: बांबोळीतील 'फुलान्चो खुरीस'जवळ भीषण अपघात; वाहन पेट घेतल्याने एक जण ठार, तर दोघे जण गंभीर जखमी
- नवी दिल्ली: आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करणे झाले आणखी सोपे; नवीन अॅपवरून घरबसल्या करा अर्ज
- जम्मू-काश्मीर: कुलगाममधील केल्लम भागात दहशतवादी हल्ला, छत्तीसगडच्या दोन मजुरांचा मृत्यू; 'लष्कर-ए-तैयबा'कडून कृत्याची कबुली
- पश्चिम बंगाल: पश्चिम बंगालमध्ये माजी सरकारी बस चालकाच्या घरी पोलिसांची धाड, २८ कोटींची रोकड आणि १५ किलो सोने जप्त



























Subscribe to my channel




