Nashik Crime News : पैसे कमवण्यासाठी चोरट्यांनी लढवली अनोखी शक्कल; तपासात समोर आलेली माहिती पाहून पोलिसही चक्रावले

Nashik Crime News : नाशिकमध्ये सायबर गुन्हेगारीचा नवा प्रकार समोर आला आहे. एका खासगी कंपनीच्या OTT प्लॅटफॉर्मवरील कंटेट चोरून स्वतःच्या OTT ॲपवर प्रसारित करून कमाईचा नवा फंडा चोरट्यांनी शोधलाय. नाशिक सायबर पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान आणि कॉपीराईट ॲक्टनुसार याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, नाशिकमध्ये सायबर गुन्हेगारीचा नवा प्रकार समोर आलाय. सायबर गुन्हेगारीच्या या नव्या फंड्यामुळे पोलीस देखील चक्रावून गेलेत. एका प्रसिद्ध खासगी कंपनीच्या OTT प्लॅटफॉर्मवरील फिल्म, वेबसिरीज, व्हिडिओज असा कंटेंट चोरून तो स्वतः तयार केलेल्या फायर व्हिडिओ या OTT ॲपवर अपलोड करण्यात येत होता.

CBI Action In Nashik : नाशिकमध्ये सीबीआयची कारवाई; दोन लाखाची लाच घेतांना पीएफ आयुक्तांसह दोन जण ताब्यात

या माध्यमातून स्वतःच्या OTT ॲपचे सबस्क्राईबर्स वाढवून देश, विदेशातील या सबस्क्राईबर्सकडून पैसे वसूल केले जात होते. गेले अनेक महिने हा प्रकार सुरू होता. संबंधित खासगी OTT कंपनीचे कमी झालेले सबस्क्राईबर्स आणि पैसे यामुळे कंपनीच्या टीमने शोध घेतला असता, नाशिकमधील एका युवकाकडून हा प्रकार केला जात असल्याचं समोर आलंय.

सायबर गुन्हेगारीचा हा नवा प्रकार समोर आल्यानंतर नाशिकच्या सायबर पोलिसांत याप्रकरणी गौरव वडनेर या युवकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस देखील या सायबर गुन्हेगारीच्या फंड्याने चक्रावून गेलेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply