Nashik Mumbai Expressway : नाशिक-मुंबई महामार्गाच्या दुरुस्तीचे काम केव्हा पूर्ण होणार? मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्टच सांगितलं

Nashik : मुंबई ते नाशिक प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. सध्या मुंबई-नाशिक महामार्गाचे दुरुस्तीचे काम सुरु आहे. या महामार्गावरील खड्डे दुरुस्तीचे काम वेगाने सुरु आहे. त्यामुळे या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. त्यामुळे या महामार्गावरील दुरुस्तीचे काम केव्हा पूर्ण होणार, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. या मुंबई-नाशिक महामार्गाच्या दुरुस्तीबाबत मंत्री छगन भुजबळ यांनी महत्वाची माहिती दिली आहे.

मुंबई-नाशिक महामार्गावरील दुरुस्तीबाबत बोलताना मंत्री छगन भुजबळ यांनी प्रशासनाला टोला लगावला. मंत्री छगन भुजबळ म्हणाले, 'नाशिकमध्ये आता आयुक्त आहेत का? शहरात खड्डे पडले असतील तर रस्ते चांगले करायला पाहिजेत. मुंबई-नाशिक महामार्गाबाबत देखील ४०% काम झाले आहे. अद्याप खूप काम बाकी आहे. काही तांत्रिक अडचणी होत्या. त्या दूर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मला तरी मुंबईला पोहोचण्यासाठी चार-पाच तासांचा वेळ लागत आहे. काही ठिकाणी वाहतूक कोंडी असते. जोपर्यंत समृद्धी महामार्गाचे काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत काही अडचण येतील'.

Pune : एसटीची डिझेलवरील वाहने ‘एलएनजी’मध्ये रूपांतरित करण्याचा घाट

मालवणमधील राड्यावरही मंत्री छगन भुजबळ यांनी भाष्य केलं. ' सर्वांना छत्रपती प्रिय आहेत. या घटनेचं दुःख आहे की, शांततेत हे घेतलं पाहिजे. कोण चुकलंय? हे हळूहळू बाहेर येईल. आतमध्ये कोणी असेल तर दुसरा बाहेर थांबतो. एकमेकांना समजून घेतले पाहिजे, तर असे वाद होणार नाहीत'.

आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊतने सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. 'आम्ही गॉडफादर नाही, पण त्यांच्यासाठी खूप काही केले आहे. त्यांना सहकार्य केले आहे. कविता राऊत यांच्याबद्दल मी किमान ५० वेळा मी मंत्रिमंडळाच्या बैठीकत पत्र दिले आहे. त्यांना जिथे जायचे आहे, तिथे त्यांच्याकडे पात्रता नव्हती. त्यांनी ते नंतर प्राप्त केले. त्यानंतर सरकारचे नियम बदलले. क्रीडा क्षेत्रात सामावून घेण्याचा निर्णय झाला. काही लोकांना पटकन न्याय मिळतो. एखादं जिंकल्यानंतर निधी आणि इतर सोयी लगेच मिळतात'.

मालवणमधील छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळण्याच्या घटनेवर भाष्य करताना मंत्री भुजबळ म्हणाले, 'छत्रपती शिवरायांचा पुतळा पडणं ही बाब दुर्दैवी आहे. फक्त मराठी माणसाचं नाही तर महाराजांवर प्रेम करणाऱ्या सगळ्यांना दुःख झालं आहे. या घटनेला कोण जबाबदार आहे, याबाबत चौकशी होईल. या प्रकरणी हलगर्जीपणा करणाऱ्यांचे नाव समोर येईल'.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply