
Nagpur : पश्चिम आशियातील युद्धाचा वणवा आता नागपूरच्या रस्त्यांवर धगधगू लागला आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीतील तणावामुळे शहरात सीएनजीचा पुरवठा विस्कळीत झाल्याची ओरड सुरू झाली असून, गॅस भरण्यासाठी पंपांवर कॅबच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. कमी दाबाने होणाऱ्या पुरवठ्यामुळे चालकांना तब्बल दोन-दोन तास ताटकळत उभे राहावे लागत असून, अनेकांनी नाईलाजास्तव महागड्या पेट्रोलचा पर्याय निवडला आहे.
कमी दाबाने गॅस मिळत असल्याने एका गाडीत इंधन भरण्यासाठी मोठा वेळ जात आहे. यामुळे दिवसाच्या ट्रिप्स कमी होऊन टॅक्सी चालकांच्या उत्पन्नावर गदा आली आहे. याबाबत अधिक सांगताना नागपुरातील कॅबचालक मिलिंद गाडगे म्हणाले,‘सीएनजी पंपांवर पूर्वीदेखील गर्दी असायची. पण, आता हा प्रतीक्षा कालावधी दोन तासांवर पोहोचला आहे. सीएनजी परवडणारा असला तरी पुरवठा अनिश्चित असल्याने आम्ही तात्पुरते पेट्रोलवर गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. रांगेत वेळ घालवण्यापेक्षा महागडे इंधन परवडले, अशी स्थिती निर्माण झाली आहे.’टॅक्सी चालकांच्या मते, सीएनजी आणि पेट्रोलच्या खर्चात मोठी तफावत आहे. पण, वेळ वाचवण्यासाठी त्यांना आर्थिक झळ सोसावी लागत आहे. ७ किलो सीएनजीसाठी साधारण ६३० रुपये लागतात, ज्यामध्ये गाडी २०० किमी धावते. पेट्रोलवर गाडी चालवण्याचा खर्च अंदाजे ७ रुपये प्रति किमी येतो.
कंपनी म्हणते ‘ऑल इज वेल’
नागपूर जिल्ह्यात सीएनजी वितरणाची जबाबदारी असलेल्या हरियाणा सिटी गॅस (एचसीजी) कडे २७ पंप आहेत. कंपनीला ‘गेल’कडून गॅसचा पुरवठा होतो. या परिस्थितीबाबत विचारणा केली असता, एचसीजीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पुरवठ्यात कोणतीही अडचण नसल्याचा दावा केला आहे. गेल्या दोन दिवसांत खप कमी झाला नसल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र, युद्धजन्य परिस्थिती अधिक चिघळल्यास सरकारकडून निर्बंध लादले जाण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले.
शहर
- Pune : पुण्यात गॅस टंचाईचा फटका, हॉटेलच्या मेन्यूमधून डोसा-उत्तप्पा, दाल मखनी गायब; शेगड्या-इंडक्शनचा जुगाड
- Ahilyanagar : गॅस तुटवड्याच्या अफवा; शिर्डी-शनिशिंगणापूरमध्ये पुरवठा सुरळीत ठेवण्याचे आव्हान, अवैध रिफिलिंगवर प्रशासनाची नजर
- मध्य-पूर्व युद्धाच्या पार्श्वभूमीवर इंधन पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी केंद्र सरकारची उच्चस्तरीय समिती
- घरगुती गॅस तुटवड्याच्या भीतीमुळे उच्च न्यायालयाची केंद्राला नोटीस, पुरवठा वाढवण्याचे निर्देश
महाराष्ट्र
- Pune - चाकण-तळेगाव-शिक्रापूर पट्ट्यातील वाहतूक कोंडीतून तूर्तास सुटका नाही; 'एलिव्हेटेड कॉरिडॉर'साठी मोजावी लागणार आणखी ४ वर्षे!
- Mumbai - वाहनचालकांनो सावधान! थकीत ई-चलन दंडासाठी पोलीस आता 'बळजबरी' करू शकणार नाहीत; कोर्टाचा मोठा निर्णय
- BREAKING: मुंबईत मोठी खळबळ! विधानभवन उडवून देण्याची धमकी; अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान सुरक्षा यंत्रणांची धावपळ
- विराग गुप्ता यांचा स्तंभ:”भारत टॅक्सी’ ओला आणि उबेरची जागा घेतेय का?
गुन्हा
- BREAKING: मुंबईत मोठी खळबळ! विधानभवन उडवून देण्याची धमकी; अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान सुरक्षा यंत्रणांची धावपळ
- Pimpri-Chinchwad : उच्चशिक्षित दुचाकीचोर अटकेत; 80 CCTV फुटेज तपासून पोलिसांची कारवाई, 22 लाखांच्या 40 बाईक जप्त
- विराग गुप्ता यांचा स्तंभ:”भारत टॅक्सी’ ओला आणि उबेरची जागा घेतेय का?
- प्रा. चेतनसिंह सोळंकी यांचा कॉलम:ऊर्जेसाठी इतर देशांवर अवलंबून राहणे हे अनेक समस्यांचे मूळ
राजकीय
- आरती जेरथ यांचा कॉलम:‘आप’ नेत्यांच्या सुटकेनंतर काँग्रेस पक्ष चिंताक्रांत का?
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
इतर
- Pune- पुणे महापालिकेचा मोठा निर्णय! २३ गावांच्या विकासासाठी ९५४ कोटींचा ‘बूस्टर डोस’
- एलपीजीच्या वाढत्या किमती आणि संभाव्य तुटवडा: स्वयंपाकासाठीचे ५ आधुनिक व किफायतशीर पर्याय
- उन्हाळ्यात घामामुळे मेकअप उतरतो? दीर्घकाळ टिकवण्यासाठी 'या' सोप्या युक्त्या वापरा.
- उत्तर प्रदेश: जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
मनोरंजन
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
विडियो गॅलेरी

देश विदेश
- Pune - चाकण-तळेगाव-शिक्रापूर पट्ट्यातील वाहतूक कोंडीतून तूर्तास सुटका नाही; 'एलिव्हेटेड कॉरिडॉर'साठी मोजावी लागणार आणखी ४ वर्षे!
- Mumbai - वाहनचालकांनो सावधान! थकीत ई-चलन दंडासाठी पोलीस आता 'बळजबरी' करू शकणार नाहीत; कोर्टाचा मोठा निर्णय
- BREAKING: मुंबईत मोठी खळबळ! विधानभवन उडवून देण्याची धमकी; अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान सुरक्षा यंत्रणांची धावपळ
- Pune; पुणे रिंग रोडसाठी प्रशासनाची मोठी झेप; भूसंपादन पूर्णत्वाकडे, लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात!


























Subscribe to my channel

