Municipal Schools Defy Rules: Morning Classes Leave Young Students Napping on Benches!

पालिकेच्या शाळांत नियमांना हरताळ: सकाळीच शाळा भरल्याने चिमुकले बाकावरच झोपले!

Municipal Schools Defy Rules: Morning Classes Leave Young Students Napping on Benches!मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या काही शाळांमध्ये शासनाच्या नियमांची पायमल्ली होत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. घाटकोपर येथील टिळक मार्ग महानगरपालिका शाळेसह शहरातील अन्य काही शाळांमध्येही नियमांना धाब्यावर बसवून सकाळच्या सत्रात शाळा भरवण्यात आली आहे.

 

शासनाच्या नियमांनुसार, प्राथमिक शाळांच्या वेळा निश्चित करण्यात आल्या आहेत. मात्र, या नियमांकडे दुर्लक्ष करत शाळा प्रशासनाने सकाळीच शाळा सुरू केल्या आहेत. यामुळे इयत्ता पहिली ते चौथीमध्ये शिकणाऱ्या चिमुकल्या विद्यार्थ्यांना पहाटेच उठून शाळेसाठी तयार व्हावे लागत आहे. इतक्या लहान वयात पहाटे लवकर उठल्यामुळे मुलांची झोप पूर्ण होत नाहीये.

शाळेत पोहोचल्यानंतर, वर्गामध्ये अध्यापन सुरू असताना अनेक विद्यार्थी बाकावरच डोके ठेवून डुलक्या घेताना किंवा झोपलेले दिसून येत आहेत. चिमुकल्यांच्या आरोग्यावर आणि त्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर याचा विपरित परिणाम होत असून, शिक्षणासारख्या महत्त्वाच्या ठिकाणी अशा प्रकारची बेजबाबदार वर्तणूक असल्याने पालक वर्गातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकारावर त्वरित कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.



गुन्हा

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *