
Mumbai Rain : गेल्या २ दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसाने मुंबईला झोडपून काढलं. या पावसामुळे मुंबईतील रेल्वे सेवा, रस्ते वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले होते. आज सकाळपासून पावसाने जरी काहिशी विश्रांती घेतली असली तरी देखील पुढचे २४ तास मुंबईकरांसाठी खूपच महत्वाचे आहेत. हवामान खात्याकडून मुंबईला पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. त्यामुळे मुंबईकरांनी घराबाहेर पडताना काळजी घेण्याचे आणि सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
२५ मे पासून मुंबईत सतत मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसाचा सर्वाधिक फटका दक्षिण मुंबईला बसला. कुलाबा येथे १४४.३ मिमी पावसाची नोंद झाली, तर सांताक्रूझमध्ये ७४.३ मिमी पावसाची नोंद झाली. भारतीय हवामान खात्याने मुंबईला पुन्हा पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. आज मुंबईत वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
गेल्या २४ तासांतला हा दुसरा रेड अलर्ट आहे. रविवारी रात्रीपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबईचे जनजीवन काहिसे विस्कळीत झाले होते. मुंबईकरांची लाफलाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकलसेवेवर मोठा परिणाम झाला. रेल्वे रूळावर पाणी साचल्यामुळे मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरील लोकलसेवा ठप्प झाली होती. तर पश्चिम रेल्वे मार्गावर लोकल उशिराने धावत होत्या. अनेक भागात रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे कामासाठी घराबाहेर पडलेल्या मुंबईकरांना ऑफिसला पोहचण्यास उशिर झाला.
दरम्यान, हवामान खात्याने कोकण किनारपट्टी, रत्नागिरी आणि गोव्यासह डोंगराळ भागात मुसळधार पाऊस सुरूच राहण्याची शक्यता वर्तवली आहे. पुणे आणि सातारा येथेही रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे, जिथे अति मुसळधार पावसामुळे स्थानिक पूर आणि विस्कळीत परिस्थिती निर्माण होऊ शकते. ठाणे, रायगड आणि कोकणातील इतर किनारपट्टी भागात देखील अति मुसळधार पाऊस पडू शकतो. हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. काही भागात परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते.
दरम्यान, हवामान खात्याने कोकण किनारपट्टी, रत्नागिरी आणि गोव्यासह डोंगराळ भागात मुसळधार पाऊस सुरूच राहण्याची शक्यता वर्तवली आहे. पुणे आणि सातारा येथेही रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे, जिथे अति मुसळधार पावसामुळे स्थानिक पूर आणि विस्कळीत परिस्थिती निर्माण होऊ शकते. ठाणे, रायगड आणि कोकणातील इतर किनारपट्टी भागात देखील अति मुसळधार पाऊस पडू शकतो. हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. काही भागात परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती



























Subscribe to my channel


