
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर इंदापुरजवळ गाडीवर गोळीबार करून 3 कोटी 60 लाख रुपये लुटुन धूम ठोकणाऱ्या टोळीचा छडा लावण्यात पुणे ग्रामीण पोलीसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला (LCB)ला यश आलं आहे. ग्रामीण पोलिसचे अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी ही धक्कायदायक माहिती दिली. 26 ऑगस्ट रोजी पहाटे अवघ्या पुणे जिल्ह्याला हादरून सोडणारी व पोलीस यंत्रणेची झोप उडवणारी घटना पुणे सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर वरकुटे बुद्रुक येथे घडली होती. स्कार्पिओ गाडीला अडवून त्यावर गोळीबार करत गाडीतील दोघांना मारहाण केली. त्यानंतर त्यांच्याकडे असलेली साडेतीन कोटी रोख रक्कम लुटली.
सुरुवातीला एवढी मोठी ही रक्कम हवालाची असल्याची चर्चा होती मात्र ही रक्कम अंगडीयाची असल्याचे पुढे आले आहे.या धक्कादायक घटनेनंतर सगळी पोलीस यंत्रणा कामाला लागली होती. अभिनव देशमुख यांनी तपासासाठी पथके तैनात केली होती.त्यानुसार रात्रंदिवस याचा तपास सुरू होता.अखेर काही चोरांना अटक केली आणि त्यांच्याकडून ही रक्कम जप्त करण्यात आली आहे. आरोपी हे सोलापुर जिल्ह्यातील कुर्डु आणि इंदापुर तालुक्यातील आहेत. या सगळ्यात 10 चोरांचा समावेश होता. रक्कम लुटल्यानंतर यातील काही चोर गुजरातला फिरायला गेले होते मात्र त्यांना मोठ्या शिताफीने ताब्यात घेण्यात आलं आहे.
या सगळ्या कारवाईत 3 कोटी 60 लाख रुपये पोलिसांनी जप्त केले आहे. यात 10 आरोपींचा समावेश आहे, अशी प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यातील तीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. बाकी आरोपी फरार असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. त्यांनाही लवकरच ताब्यात घेऊ, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
पुण्यातील बिबवेवाडी परिसरात घरातून रोकड आणि 6 तोळ्यांचे सोन्याचे दागिने चोरणाऱ्या एका चोराला गुन्हे शाखा आणि बिबवेवाडी पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी अटक केली होती . गुन्ह्यात मदत करणाऱ्या त्याच्या साथीदारांनाही अटक करण्यात आली होती. 34 वर्षीय मुश्तफा उर्फ बोना शकील अन्सारी, 29 वर्षीय जुनैद रिझवान सैफ आणि 31 वर्षीय हैदर कल्लू शेख अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे होती. रोख रक्कम आणि दागिने चोरणाऱ्या अन्सारी याला गुन्हे शाखेने अटक केली होती तर अन्य दोन आरोपींना पोलिस ठाण्याच्या पथकाने अटक होती.
शहर
- उत्तर प्रदेशच्या विद्यार्थिनींसाठी आनंदाची बातमी! 'राणी लक्ष्मीबाई योजने'अंतर्गत ५० हजार मेधावी मुलींना मिळणार मोफत स्कूटी
- शिवनेरी पायथ्याशी शिवराज्याभिषेकाचा अभूतपूर्व जल्लोष! २६ लाखांच्या हायड्रोलिक लिफ्टचे उद्घाटन; जुन्नरमध्ये 'बिबट सफारी' प्रकल्पाला मंजुरीची घोषणा!
- मुंबईत पाणी माफियांचा खेळ खल्लास! पालिकेकडून वॉटर टँकरसाठी 'OTP' सिस्टीम लागू; आता घरबसल्या करा पारदर्शक बुकिंग!
- उत्तर प्रदेशात 'सैराट'सारखा थरार! परीक्षा केंद्राबाहेर पडलेल्या पत्नीला घेण्यासाठी आलेल्या पतीची साल्याकडून हत्या
महाराष्ट्र
- उत्तर प्रदेशच्या विद्यार्थिनींसाठी आनंदाची बातमी! 'राणी लक्ष्मीबाई योजने'अंतर्गत ५० हजार मेधावी मुलींना मिळणार मोफत स्कूटी
- शिवनेरी पायथ्याशी शिवराज्याभिषेकाचा अभूतपूर्व जल्लोष! २६ लाखांच्या हायड्रोलिक लिफ्टचे उद्घाटन; जुन्नरमध्ये 'बिबट सफारी' प्रकल्पाला मंजुरीची घोषणा!
- मुंबईत पाणी माफियांचा खेळ खल्लास! पालिकेकडून वॉटर टँकरसाठी 'OTP' सिस्टीम लागू; आता घरबसल्या करा पारदर्शक बुकिंग!
- उत्तर प्रदेशात 'सैराट'सारखा थरार! परीक्षा केंद्राबाहेर पडलेल्या पत्नीला घेण्यासाठी आलेल्या पतीची साल्याकडून हत्या
गुन्हा
- पुणे: बंडू आंदेकर टोळीतील सराईत गुंडाला बेड्या; आठ महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणारा ओम नगरकर गजाआड
- पिंपरी-चिंचवड: बनावट 'आरटीआय' कार्यकर्त्यांचा पर्दाफाश: पीएमआरडीए (PMRDA) अधिकाऱ्यांना धमकावून खंडणी उकळणाऱ्या टोळीला अटक!
- उत्तर प्रदेश: शामली धर्मांतर अमली पदार्थ तस्कराचा मुलगा 'आयुष' पाकिस्तानी धर्मप्रसारकांच्या भाषणांचा होता चाहता!
- झारखंड: गर्लफ्रेंडसाठी पोटच्या ३ चिमुरड्या मुलींचा झोपेतच गळा चिरला; निर्घृण तिहेरी हत्याकांडाने देश हादरला
राजकीय
- कोल्हापुरात 'शक्तीपीठ महामार्गा'वरून राजकीय ठिणगी; सतेज पाटील आणि राजेश क्षीरसागर आमनेसामने!
- तृणमूल काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप; २० खासदार 'नॉट रिचेबल', गुप्त बैठका आणि संभाव्य फुटीच्या चर्चांनी ममता बॅनर्जींची चिंता वाढली.
- पंजाब भाजपमध्ये मोठी खळबळ; प्रदेशाध्यक्षपदी के.एस. ढिल्लों यांच्या नियुक्तीनंतर सरचिटणीस डॉ. जगमोहन सिंग राजू यांचा राजीनामा.
- ममता बॅनर्जींना दिल्लीत मोठा धक्का; तृणमूलच्या दोन राज्यसभा खासदारांचा तडकाफडकी राजीनामा.
इतर
- आजचे राशीभविष्य: मंगळाच्या कृपेने या राशींना होणार धनलाभ, मालमत्ता खरेदीचे योग!
- एसटीचा प्रवास आता अधिक हायटेक! सवलतीसाठी 'एनसीएमसी' स्मार्ट कार्ड अनिवार्य, तर बसस्थानकांच्या २०० मीटर परिसरात अवैध वाहतुकीवर बंदी!
- रोज सकाळी जिरे पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर की अपायकारक? डॉक्टरांनी सांगितली सत्यता.
- ८ जून २०२६ रोजी कोणत्या राशींवर होणार धनवर्षाव? जाणून घ्या तुमचे भविष्य!
मनोरंजन
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
देश विदेश
- उत्तर प्रदेश: शामली धर्मांतर अमली पदार्थ तस्कराचा मुलगा 'आयुष' पाकिस्तानी धर्मप्रसारकांच्या भाषणांचा होता चाहता!
- झारखंड: गर्लफ्रेंडसाठी पोटच्या ३ चिमुरड्या मुलींचा झोपेतच गळा चिरला; निर्घृण तिहेरी हत्याकांडाने देश हादरला
- इस्रायलमध्ये उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा; भारत-इस्रायल मैत्रीची नवी गाथा
- दाम्पत्य रस्ता चुकले, जिवाला मुकले! गोवा बांबोळी महामार्गावर कारची दुचाकीला जोरदार धडक; वृद्ध पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू

























Subscribe to my channel


