पुणे : ‘लिव्ह इन’मध्ये राहणाऱ्या महिलेची आत्महत्या; प्रियकर, पतीकडून होती त्रस्त

पुणे : एका उच्चशिक्षित महिलेने पुढील शिक्षणासाठी पती व सासरच्या मंडळीकडे आग्रह धरला. मात्र, कुटुंबीयांनी तिच्या शिक्षणाला विरोध केला. मात्र, ती शिक्षण घेण्यासाठी आग्रही होती. यामुळे ती पुण्याला राहायला आली होती. मात्र, पती व कुटुंबीयांकडून होणारा त्रास कमी न झाल्याने दहाव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या  केली. मानसी यादव (२७, रा. खराडी परिसर, पुणे) असे आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मानसीला एलएलबी करायचे होते. परंतु, तिच्या शिक्षणाला पती, सासू, सासरेंचा विरोध असल्याने नेहमी वाद होत होता. सततच्या वादाला कंटाळून व शिक्षणासाठी ती पुण्यात राहायला आली होती. यावेळी तिची शिरीष शहा या युवकासोबत ओळख झाली. नंतर मैत्री व मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले.

यामुळे मानसी व शिरीष दोघेही ‘लिव्ह इन’मध्ये राहू लागले. मात्र, शिरीष कोणतेही काम करीत नसल्याने दोघांमध्ये वाद होत होते. एकीकडे सासरच्या मंडळीचा त्रास तर दुसरीकडे प्रियकरामुळे त्रस्त झालेल्या मानसीने दहाव्या मजल्यावरील घराच्या बाल्कनीमधून पाच एप्रिल रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास उडी घेत आत्महत्या केली



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *