Mumbai - Pune Expressway : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर ट्रॅफिक जाम; वाहनांच्या लांबच लांब रांगा, प्रवाशांचा खोळंबा

मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावर ट्रॅफिक जाम झाल्याची माहिती समोर आली आहे. वीकएंड असल्यानं मोठ्या संख्येने मुंबईकर घराबाहेर पडले आहेत. त्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी निर्माण झाली आहे. 

सुट्टीमुळे नागरिक घराबाहेर पडलेत. मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात. अशातच येथे एक छोटासा अपघात देखील घडला आहे. यामुळं बोरघाटात वाहतूक कासवगतीने सुरुये. पुढील काही काळ अशीच परिस्थिती राहण्याची चिन्ह आहेत. पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. तळेगाव टोल नाका ते लोणावळापर्यंत वाहतूक कोंडी आहे. लोणावळा घाटातही वाहनांच्या लांब रांगा लागल्यात

 

Fire Breakout In Andheri East Building : साकीनाका परिसरातील इमारतीला आग,सुदैवाने जीवितहानी नाही

पुणे-मुंबई द्रुतगतीमार्ग मंदावला आहे.वाहतूक सुरळीत होण्यासाठी दोन ते तीन तासांचा वेळ लागण्याची शक्यता आहे. गेल्या महिन्याभरात मुंबईत पावसाने विश्रांती घेतली होती. अशात गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावल्याने पर्यटक घराबाहेर पडलेत.

शनिवार-रविवार लागून सुट्टी असल्याने कुटुंबीय, मित्रमंडळी घराबाहेर पडले आहेत. मात्र बाहेर फिरायला जाण्यासाठीच्या त्यांच्या आनंदात वाहतूक कोंडी मिठाचा खडा पडला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply