Mumbai : PM मोदींच्या दौऱ्याआधी मोठ्या घडामोडी! काँग्रेसचं आंदोलन, खासदार वर्षा गायकवाड स्थानबद्ध; मुंबईत वातावरण तापलं!

Mumbai : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. पालघर येथील वाढवण बंदर पायाभरणी सोहळा पंतप्रधान मोदींच्या हस्ते पार पडणार आहे. मात्र मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यानंतर मोदींच्या या दौऱ्याला काँग्रेसने विरोध दर्शवला आहे. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यावेळी निषेध आंदोलन करणार असल्याचे खासदार वर्षा गायकवाड यांनी सांगितले होते. काँग्रेसच्या या आक्रमक पवित्र्यानंतर मुंबईमध्ये मोठ्या घडामोडी पाहायला मिळत असून काँग्रेस नेत्यांच्या घराबाहेर बंदोबस्त वाढवण्यात आला आहे तसेच वर्षा गायकवाड यांनाही स्थानबद्ध केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यात काँग्रेसच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात येणार आहे. राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळ्याप्रकरणी मोदींनी माफी मागावी, अशी मागणी वर्षा गायकवाड यांनी केली होती. याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य व प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा गायकवाड यांच्या घरी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आले आहे, तसेच वर्षा गायकवाड यांना स्थानबद्ध करण्यात आले आहे.

Mumbai Hit and Run : मुंबईत पुन्हा हिट अँड रनचा थरार; भरधाव कारच्या धडकेत २४ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

"छत्रपती शिवाजी महाराज यांच्याप्रती असलेल्या अस्मितेखातर आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी व्यक्त होणे हा गुन्हा आहे का? आज आम्हाला रोष व्यक्त करण्यापासून रोखले जात आहे, हे नक्कीच शिवरायांचे राज्य नाही. आमच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले जात आहे? माझ्या राहत्या घराबाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा लावण्यात आला आहे. का? कशासाठी? घडल्या घटनेचा प्रधानमंत्र्यांना आम्ही जाब विचारू नये म्हणून?" असे म्हणत वर्षा गायकवाड यांनी संताप व्यक्त केला आहे.

तसेच ज्यांनी पुतळ्याचे कंत्राट दिले, ज्यांनी पुतळ्याची रचना केली आणि ज्यांनी पुतळा उभारला त्या मुख्य दोषींना मोकळं सोडून एवढा मोठा पोलिसांचा फौजफाटा माझ्या घराबाहेर लावला आहे.. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना सुद्धा कारागृहात डांबून ठेवण्यात येत आहे.. हे पहा व्हिडिओज.. जेरबंद केले तरी बेहतर.. आम्ही मागे हटणार नाही.. महाराजांच्या स्वाभिमानासाठी आम्ही लढणार,असेही त्या म्हणाल्यात.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply