Atal Setu: अटल सेतूवर कार थांबवली अन् समुद्रात उडी मारली; घटना CCTV मध्ये कैद

Mumbai : अटल सेतूवरून ४० वर्षांच्या व्यक्तीने समुद्रामध्ये उडी मारली. अटल सेतूवर कार पार्क करून या व्यक्तीने समुद्रात उडी मारली. घटनेची माहिती मिळताच शिवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. समुद्रात उडी मारलेल्या व्यक्तीचा शोध सुरू आहे. पोलिस या कारच्या मदतीने ही व्यक्ती नेमकी कोण आहे? याचा शोध घेत आहे. काही दिवसांपूर्वी अटल सेतूवरून उडी मारत पुण्याच्या बँकरने आत्महत्या केली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, शिवडी पोलिस स्टेशनच्या हद्दीतील अटल सेतू ८.५ किमी येथे एका व्यक्तीने समुद्रामध्ये उडी टाकून आत्महत्येचा प्रयत्न केला. आज सकाळच्या सुमारास ही घटना घडली. या व्यक्तीने अटल सेतूवर आपली कार उभी करून समुद्रात उडी मारली. घटनेची माहिती मिळताच तात्काळ वरिष्ठ पोलस निरीक्षक, ठाणे अमलदार यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी उडी मारलेल्या व्यक्तीची लाल रंगाची कार उभी आहे.

Nagpur Accident : नागपुरात भीषण अपघात; भरधाव वाहनाच्या धडकेत बाप-लेकासहित तिघांचा मृत्यू

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटल सेतू नियंत्रण कक्ष येथील सीसीटीव्ही फुटेज तपासणी केली असता ही घटना सकाळी ९.५७ च्या सुमारास घडल्याचे दिसून आले. घटनास्थळी रेस्क्यू टीम आली असून आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या व्यक्तीचा शोध घेत आहेत. या व्यक्तीच्या नातेवाईकांचा शोध घेऊन त्यांना संबंधित माहिती देण्यात येणार आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply