Mumbai : अल्पवयीन मुलींवर अत्याचार, मुंबईतील दोन प्रकरणे उघडकीस

Mumbai : बदलापूर येथील शाळेत बालिकांवरील लैंगिक अत्याचाराच्या प्रकाराने राज्यभरात संतापाची लाट उसळलेली असतानाच मुंबईत बुधवारी अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराची दोन प्रकरणे उघडकीस आली आहेत. समाजमाध्यमांवर ओळख झालेल्या मित्राने १३ वर्षांच्या मुलीला गुजरातला नेऊन तिच्यावर अत्याचार केला, तर दुसऱ्या प्रकरणात कांदिवली परिसरात घरात शिरलेल्या तरुणाने १४ वर्षांच्या अपंग मुलीचा विनयभंग केला.
पहिल्या प्रकरणी पीडित मुलीची आरोपीशी समाजमाध्यमावरून ओळख झाली होती. आरोपीने पीडित मुलीला अंधेरी येथे एका ठिकाणी नेऊन तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर तिला १५ ऑगस्ट रोजी गुजरातला नेऊन तेथेही आरोपीने तिच्यावर तीन वेळा अत्याचार केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. पीडित मुलगी बेपत्ता झाल्यामुळे कुटुंबीयांनी तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर ती घरी आली; परंतु ती शांत होती. कुटुंबीयांनी तिला विश्वासात घेऊन विचारले असता तिने घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर समाजमाध्यमावरील छायाचित्र मुलीला दाखवून कुटुंबीयांनी आरोपी तरुणाला शोधले. त्यानंतर त्याला पोलीस ठाण्यात नेऊन घडलेला प्रकार कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन याप्रकरणी पोलिसांनी आरोपी तरुणाविरोधात अपहरण, बलात्कार व पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

Pune : पुणे विमानतळाचं करायचं काय?

 

आरोपी हॉटेलमध्ये कामाला असून गोरेगाव परिसरात राहतो. शासकीय रुग्णालयात पीडित मुलीची वैद्याकीय तपासणी करण्यात आली. आरोपीने १४ व १५ ऑगस्ट रोजी पीडित मुलीवर अत्याचार केला. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

दुसऱ्या घटनेतील पीडित मुलगी अपंग आहे. घटनेच्या दिवशी आई-वडील कामावर गेल्यामुळे मुलगी एकटीच घरात होती. त्या वेळी आरोपी बळजबरीने त्यांच्या घरात शिरला आणि त्याने मुलीशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे पीडित मुलगी घाबरली. काही दिवसांपासून मुलगी शांत असल्याचे आईच्या लक्षात आले. तिला विश्वासात घेऊन आईने विचारणा केली असता तिने घडलेला प्रकार सांगितला. पीडित मुलीच्या आईने या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी तात्काळ बुधवारी पहाटे या प्रकरणी विनयभंग व पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलीस पथक आरोपी राहत असलेल्या परिसरात पाठवण्यात आले. त्यांनी आरोपीला ताब्यात घेतले. गुन्ह्यात त्याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. आरोपीविरोधात यापूर्वी कोणताही गुन्हा दाखल नाही. तक्रारीनुसार ही घटना १९ ऑगस्ट रोजी घडली होती. त्यामुळे घाबरलेल्या मुलीने याबाबत घरी सांगितले नाही, असे पोलिसांनी सांगितले.

खार येथे मुलींचा पाठलाग करणाऱ्याला अटक

दोन अल्पवयीन मुलींचा पाठलाग करणाऱ्या २१ वर्षीय तरुणाला खार पोलिसांनी अटक केली. पीडित मुली सख्ख्या बहिणी आहेत. या प्रकरणी मुलींच्या आई-वडिलांनी खार पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर आरोपीविरोधात विनयभंग व बालकांचे लैंगिक अपराध संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी खार पोलिसांनी २१ वर्षीय आरोपीला तात्काळ अटक केली आहे. आरोपी मुलींच्या शेजारी राहत होता. पीडित मुली ६ व १२ वर्षांच्या आहेत. आरोपी पाठलाग करत असल्याचे त्यांनी घरी सांगितले होते. त्यानंतर पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार केली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply