Mumbai Dam Water Level: मुंबईकरांचं पाण्याचं टेन्शन मिटलं! सातही धरणातील पाणीसाठा ९० टक्क्यांवर, वाचा ताजी आकडेवारी

Mumbai : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण मुंबईकरांचा वर्षभराचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही जलाशयांमधील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे. सातही जलाशयांमधील पाणीसाठा ९० टक्क्यांवर पोहचला आहे. धरणक्षेत्रात असाच पाऊस सुरू राहिला तर येत्या काही दिवसात जलाशयांमधील पाणीसाठ्यात वाढ होऊन १०० टक्क्यांवर पोहचेल. ७ जलाशयांपैकी ४ जलाशये ओव्हर फ्लो झाली आहेत. या धरणांमध्ये आजच्या तारखेपर्यंत किती पाणीसाठा जमा झाला हे आपण जाणून घेणार आहोत...

मुंबई महानगर पालिकेने सोमवारी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही जलाशयांमधील पाणीसाठा ९० टक्के इतका झाला आहे. ५ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजता मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही जलाशयांमधील पाणीसाठा १३,०२,६१९ दशलक्ष लिटर इतका झाला. म्हणजेच या धरणांमध्ये एकूण ९० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. मागच्या वर्षी याच दिवशी या धरणांमध्ये ११,५७,९१९ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा होता. म्हणजेच ८० टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. मागच्यावर्षीच्या तुलनेत आजच्या दिवशी सातही धरणातील पाणीसाठा १० टक्क्यांनी वाढला आहे.

Raj Thackeray : महाराष्ट्रात आरक्षणाची गरज नाही, राज ठाकरेंचं मोठं विधान; शरद पवारांनाही लगावला टोला

मुंबई शहर आणि उपनगराला ७ जलाशयांमधून पाणीपुरवठा केला जातो. अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या ७ जलाशयांमधून मुंबईला पाणी पुरवठा केला जातो. यामध्ये ५ धरण आणि २ तलाव आहेत. यासातही धरण आणि तलाव क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून चांगला पाऊस पडत आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. यामधील तुलसी, विहार, मोडक सागर आणि तानसा ही जलाशये ओव्हर फ्लो झाली आहेत. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या या सातही धरणांमध्ये १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाणी साठवण्याची क्षमता आहे. या धरणांमधून मुंबईला दिवसाला ३ हजार दशलक्ष लिटर पाणीपुरववठा केला जातो.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणातील पाणीसाठा -

- अप्पर वैतरणा - ७५.७६ टक्के पाणीसाठा

- मोडक सागर - १०० टक्के पाणीसाठा.

- तानसा - ९९.३० टक्के पाणीसाठा.

- मध्य वैतरणा - ९५.४१ टक्के पाणीसाठा

- भातसा - ८८.८७ टक्के पाणीसाठा.

- विहार - १०० टक्के पाणीसाठा.

- तुलसी - १०० टक्के पाणीसाठा.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply