Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंची तुफान टोलाबाजी; राज ठाकरे आणि छगन भुजबळांचं नाव घेत केला मोठा खुलासा

Mumbai : शिवसेना वर्धापन दिनानिमित्त जाहीर सभेत उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि सत्ताधाऱ्यांवर कडाडून टीका केली. महायुतीला दिलेल्या पाठिंब्यावरून उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना लक्ष्य केलं. तर छगन भुजबळ हे ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांनाही अफवा असल्याचं म्हणत फेटाळून लावलं. त्यामुळे छगन भुजबळ हे उद्धव ठाकरेंच्या संपर्कात असल्याच्या चर्चांना त्यांनीच पूर्णविराम दिला.

छगन भुजबळ संपर्कात असल्याच्या चर्चांवर भाष्य करताना उद्धव ठाकरे म्हणाले, 'लोकसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे भाजपसोबत जाणार असल्याची अफवा पसरवली. ज्यांनी आपला पक्ष संपवण्याचा प्रयत्न केला. ज्यांनी पक्ष दुसऱ्याच्या दावणीला बांधला, त्यांच्याबरोबर कधीही जाणार नाही. छगन भुजबळ संपर्कात असल्याची अफवा पसरवली'

'अपयश झाकण्यासाठी भाजपवाले काहीही बोलत आहेत. भुजबळ शिवसेनेत येणार, या अफवा भाजपवाले पसरवत आहेत. मी त्यांच्याशी बोललो नाही. तसेच तेही माझ्याशी बोलले नाही. ते त्यांच्या वाटेने चालले असून आम्ही आमच्या वाटेने चाललो आहोत, असे ठाकरे पुढे म्हणाले.

Pune : जमीन व्यवहारात निवृत्त मुख्याध्यापिकेची दोन कोटींची फसवणूक; दहा लाखांची खंडणी मागणाऱ्या सहा जणांविरुद्ध गुन्हा

उद्धव ठाकरे राज ठाकरेंवर काय म्हणाले?

राज ठाकरे यांच्यावर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले,'काही लोकांना मी नको म्हणून बिनशर्त पाठिंबा दिला. उद्धव ठाकरे नको होतो, म्हणून 'बिन शर्ट' पाठिंबा दिला. काही लोकांनी लढण्याचे नाटक करून पाठिंबा दिला. आम्हाला नाटक जमत नाही, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना टोला लगावला.

सत्ताधाऱ्यांच्या आरोपावर उद्धव ठाकरे काय म्हणाले?

ठाकरे गटाला मुस्लिम मते पडले, या टीकेवर भाष्य करताना उद्धव ठाकरे म्हणाले, 'शिवसेनेला मुस्लिम मते पडली आहेत. हो जरूर पडली आहेत. संपूर्ण देशभक्तांची मते पडले आहेत. काँग्रेससोबत जाऊन शिवसेनेने हिंदुत्व सोडले, अशी टीका करण्यात आली. सर्व डोमकावळे तिकडे जमले आहेत. काव काव करत आहेत. माझं स्पष्ट आणि ठाम आरोप आहे की, मोदींनी सत्तेसाठी हिंदुत्व सोडलं आहे.

'आज मोदींसोबत चंद्राबाबू नायडू, नितीश कुमार आहेत. ते हिंदुत्ववादी आहेत का? चंद्रबाबू नायडू यांनी जो जाहीरनामा प्रसिद्ध केलाय, तो मोदी पूर्ण करणार का, ते सांगावे. शिवसेना समोरून वार करेल. शिवसेना पाठून वार करणारी औलाद नाही. महाविकास आघाडीला स्वयंसेवी संस्थानी देश वाचवण्यासाठी इंडिया आघाडीला पांठिबा दिला, असे ठाकरेंनी सांगितले.

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply