MPSC : विद्यार्थ्यांच्या लढ्याला यश; अखेर आयोगाने घेतला मोठा निर्णय; नवा अभ्यासक्रम 2025 पासून लागू होणार

MPSC News : पुण्यात सुरु असलेल्या एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश मिळालं आहे. आता एमपीएससीचा नवा अभ्यासक्रम यंदापासून नाही तर 2025 पासून लागू करण्याचा निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आला आहे. यानंतर विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने याबाबत ट्वीट करून माहिती दिली आहे. 'राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या वर्णनात्मक स्वरूपाच्या परीक्षेसंदर्भातील उमेदवारांची मागणी, कायदा व सुव्यवस्थेची निर्माण झालेली परिस्थिती व उमेदवारांना तयारीसाठी द्यावयाचा अतिरिक्त कालावधी विचारात घेऊन सुधारित परीक्षा योजना व अभ्यासक्रम सन २०२५ पासून लागू करण्यात येत आहे' असे एमपीएससीने ट्वीटमध्ये म्हटले आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *