
Thane : मुंबईसह संपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱ्या मिरा रोड हत्याकांड प्रकरणातील आरोपी मनोज सानेची न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी करण्यात आली आहे. आज आरोपीला ठाणे सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. आरोपीची पोलीस कोठडी संपल्यानंतर न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीमध्ये केली आहे. आरोपी मनोज आणि सरस्वती लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. दोघांमध्ये झालेल्या वादानंतर मनोजने तिची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे करुन व्हिलेवाट लावण्याचा प्रयत्न केला होता.
मिरारोडच्या नयानगरमध्ये ही घटना घडली होती. मनोज साने आणि सरस्वती वैद्य या ठिकाणच्या गीता आकाशदीप या इमारतीमध्ये राहत होते. मनोजने सरस्वतीची हत्या केली होती. हत्येनंतर त्याने तिच्या मृतदेहाचे ट्री कटर मशीनच्या सहाय्याने तुकडे तुकडे केले. ते त्याने मिक्सरमध्ये टाकून बारीक केले तर काही प्रेशर कूकरमध्ये शिजवले आणि कुत्र्यांना खाऊ घातले. मनोजच्या घरातून दुर्गंधी येत असल्याने शेजारी राहणाऱ्यांनी तक्रार केली त्यानंतर ही धक्कादायक घटना समोर आली होती.
नयानगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सरस्वतीचा मृतदेह ताब्यात घेतला होता. त्यानंतर त्यांनी आरोपीला अटक केली होती. आरोपीने सरस्वतीच्या हत्येची कबुली दिली. पोलीस अटक करतील या भीतीने त्याने सरस्वतीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला असल्याचे चौकशीत सांगितले.पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली त्यावेळी त्यांना आरोपी मनोज सानेच्या घरातील बेडरुम आणि स्वयंपाक घरामध्ये बादल्या, टब, कुकर आणि इतर भांड्यांमध्ये मृतदेहाचे तुकडे दिसले होते.हे पाहून पोलिसांनाही हादरा बसला होता.
या प्रकरणाच्या तपासादरम्यान आरोपींनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत हे एकून पोलिसही चक्रावले. सुरुवातीला त्याने सरस्वतीने आत्महत्या केली असल्याचे सांगितले होते. पोलिसांच्या भीतीने त्याने तिच्या शरीराचे तुकडे करुन विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले होते. मनोजने तो एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याचे देखील सांगितले होते. पण सरस्वती ही मनोजला मामा बोलत असल्याचे देखील समोर आले होते. ऐवढेच नाही तर आरोपीने पोलिसांना सरस्वती माझ्या मुलीसारखी होती आम्ही कधीच शारीरिक संबंध ठेवले नसल्याचे सांगितले होते.
त्यानंतर मनोज सानेने पोलिसांना हे देखील सांगितले होते की, सरस्वती आणि त्याने लग्न केले होते. सरस्वती त्याची पत्नी होती. तर सरस्वती त्याला आपला मामा असल्याचे सांगायची. मनोजने बोरीवलीच्या एका स्टोअरमधून विषारी औषध खरेदी केल्याची माहिती समोर आली होती. तसंच तो टी-कटर मशीन खराब झाल्यामुळे दुकानात दुरुस्तीसाठी घेऊन गेला होता अशी माहिती देखील समोर आली होती. या घटनेचा नयानगर पोलिसांकडून कसून तपास सुरु आहे.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
- पुणे: लवळे फाट्या जवळ भीषण साखळी अपघात! सिमेंटचा ट्रक, डंपर, टेम्पो आणि दोन दुचाकींमध्ये जोरदार धडक; एक जण जागीच ठार, दोघे गंभीर जखमी
- पुणे: म्हाळुंगे-नांदे रोडवर मोठा अपघात! चालकाला डुलकी लागल्याने कर्नाटक पासिंगचा आरएमसी ट्रक उलटला; रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप
महाराष्ट्र
- पुणे: सरकारला फुले-आंबेडकरी विचारांची ताकद बघायची आहे का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीवर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा संतप्त सवाल
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- कोल्हापूर: गांधी जयंतीनिमित्त कोल्हापुरात अनोखी परंपरा! कारागीर फिरोज सत्तारमेकर यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्यास सर्वप्रथम अर्पण केली पुष्पमाला
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?























Subscribe to my channel




