Manoj Jarange : फडणवीस साहेब थोडं थांबा, तुम्हाला त्या गोष्टीचा पश्चाताप होईल; मनोज जरांगेंनी कोणता संदर्भ दिला?

Manoj Jarange : जालना जिल्ह्यातील अंतरावली सराटी गावात पोलिसांवर दगडफेक करणाऱ्या तसेच आरक्षणासाठी रस्त्यावर जाळपोळ करणाऱ्या आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार नाही, अशी स्पष्ट भूमिका गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली. सर्व बाबींची माहिती घेतल्यानंतर गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया केली जाईल, असं लेखी निवेदन देखील फडणवीसांनी विधानसभेत दिलं.  

फडणवीसांच्या या भूमिकेमुळे मराठा समाज आक्रमक झाला आहे. आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचं आश्वासन देऊनही फडणवीसांनी ऐनवेळी आपली भूमिका बदलल्याचा आरोप केला जात आहे. यावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Marathwada Drought Survey : मराठवाड्यातील दुष्काळ पाहणीसाठी केंद्रीय पथक येणार; तारीखही ठरली

"देवेंद्र फडणवीस आपलं स्टेटमेंट बदलतील, ते त्यांच्या मूळ भूमिकेवर येतील. जर नाही आले, तर त्यांनाही मराठा समाजाच्या रोषाला सामोरं जावं लागेल", असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. ते नांदेडमध्ये बोलत होते.

"एका व्यक्तीच्या (भुजबळाच्या) दबावाखाली येऊन आपण असं स्टेटमेंट करीत असाल, तर तुम्ही थोडं थांबा फडणवीस साहेब मराठा काय आणि महाराष्ट्र काय, तुमच्या लक्षात येईल. त्यावेळी तुम्हाला वाटेल, की याचं (भुजबळांचं) उगाच ऐकलं", असं जरांगे म्हणाले.

"आरक्षण मिळवण्याची खरी ताकद सर्वसामान्य माणसांमध्ये आहे. पांढरे कपडे घालणाऱ्यांमध्ये नाही. कारण, आम्हाला आमच्या लेकरांचे दु:ख त्यांच्या वेदना माहित आहेत. त्यामुळे सामान्य मराठा काय करू शकतो, हे नेत्यांना देखील माहित आहे", असंही जरांगे म्हणाले.

मंत्री छगन भुजबळ आज इंदापुरात ओबीसींची एल्गार सभा घेणार आहेत. याविषयी जरांगे यांना विचारलं असता, "लोकशाहीत सभा घेण्याचा कुणालाही अधिकार आहे. पण वयाचा विचार करून बोललं पाहिजे. दंगली घडतील अशा गोष्टी माणसाने बोलू नये", असा सल्लाही जरांगे यांनी भुजबळांना दिला आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply