Malad Fire News : मालाड येथील झोपडपट्टीला भीषण आग; ५० हून अधिक झोपड्या जळून खाक, एकाचा मृत्यू

Mumbai Malad Fire Accident : मुंबईतील मालाड परिसरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. मालाड पूर्वच्या जामरुशीनगर परिसरात असलेल्या झोपडपट्टीला भीषण आग लागली आहे. आतापर्यंत या आगीत ५० हून अधिक झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. तर एका व्यक्तीचा मृत्यू देखील झाला आहे. 

आगीची माहिती मिळताच, अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास ही आग लागली. घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने ही आग लागल्याची प्राथामिक माहिती आहे.

आतापर्यंत या आगीत ५० हून अधिक झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. तर एका व्यक्तीचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. आगीची माहिती मिळताच, अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहे. अजूनही ही आग आटोक्यात आलेली नाही. या थरारक घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे.

गेल्या महिनाभरापासून मुंबईत ठिकठिकाणी आग लागण्याचे सत्र सुरूच आहे. अगदी दोन दिवसांपूर्वीच मुंबईतील गिरगावमधील एलआयसी बिल्डिंगच्या दुसऱ्या मजल्याला आग लागली होती. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. विशेष बाब म्हणजे गेल्या वर्षभरात एलआयसीच्या इमारतीला दुसऱ्यांदा आग लागली.

दुसरीकडे मुंबईतील मुलुंड पश्चिम परिसरात असलेल्या एका हॉटेलला रविवारी दुपारच्या सुमारास आग लागली होती. अग्निशमन दलाचे जवान आणि वाहने तातडीने घटनास्थळी दाखल झाल्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवणे काही वेळत शक्य झाले. आगीत कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र, तिघे जण जखमी झाले होते.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply