सोलापूर: महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातून एक अत्यंत मोठी आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे. राज्यभरात गाजलेल्या भोंदूगिरी, अंधश्रद्धा पसरवणे आणि आर्थिक फसवणुकीच्या गंभीर गुन्ह्यांमध्ये अडकलेला भोंदूबाबा मनोहर उर्फ 'मामा' चंद्रकांत भोसले आणि भाजप नेता प्रा. रामदास झोळ यांच्यासह एकूण ८ जणांवर सोलापूर ग्रामीण पोलिसांकडून अत्यंत कठोर अशी 'मोक्का' (MCOCA) अंतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. या धडक कारवाईमुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, भोंदूबाबा मनोहर मामा भोसले याच्यावर नागरिकांच्या समस्या सोडवून देण्याच्या, अघोरी पूजा करण्याच्या नावाखाली आणि कर्करोग व मणक्यासारखे गंभीर व दुर्धर आजार बरे करण्याचे खोटे आश्वासन देऊन लाखो रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याने लोकांची फसवणूक करून गोळा केलेला काळा पैसा पांढरा करण्यासाठी आणि त्याची विल्हेवाट लावण्यासाठी भाजप नेता रामदास झोळ यांच्याशी संबंध जोडल्याचे व शिक्षण संस्थेच्या माध्यमातून व्यवहार केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले होते. या प्रकरणात यापूर्वी काही जणांना अटक करण्यात आली होती, तर मुख्य संशयित आणि भाजप नेते रामदास झोळ हे सध्या फरार असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत.
सोलापूरचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी या प्रकरणाची सविस्तर माहिती दिली असून, संघटित गुन्हेगारी कायद्याचा (मोक्का) बडगा उगारल्यामुळे आता या प्रकरणातील कायदेशीर कारवाई अधिक तीव्र झाली आहे. भोंदूबाबा मनोहर मामा भोसले याने केवळ सोलापूरच नव्हे तर बारामती, दौंड आणि करमाळा यांसारख्या विविध भागांमध्ये रुग्णांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले होते. या सर्व गुन्ह्यांची व्याप्ती आणि संघटित गुन्हेगारीचे जाळे लक्षात घेऊन पोलिसांनी ही कडक पावले उचलली आहेत. सध्या फरार असलेल्या भाजप नेत्याचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके कार्यरत असून या प्रकरणी पुढील कायदेशीर तपास वेगाने सुरू आहे.
शहर
- पुणे: रिंगरोड'ला अजित पवारांचे नाव देण्याच्या मागणीवरून रोहित पवारांनी राज्य सरकारची केली कोंडी; पुण्यतिथीला आंदोलनाचा इशारा
- छत्रपती संभाजीनगर: आधी जीआर, मगच माघार!; सुधारित वेतनश्रेणीसाठी राज्यातील ३४ हजार न्यायालयीन कर्मचारी बेमुदत संपावर, कामकाज ठप्प
- मुंबई: बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृती दालनाचं उद्घाटन कोण करणार? उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितले, सत्ताधाऱ्यांना लगावला टोला
- मुंबई: लोकलमध्ये धक्कादायक थरार! दोन प्रवाशांच्या भांडणात फेकलेला चाकू घुसला तिसऱ्याच निष्पाप प्रवाशाच्या छातीत; अंधेरीतील घटना
महाराष्ट्र
- पुणे: भक्तीचा महासागर! प.पू. श्री शंकर महाराजांच्या प्रगटदिन सोहळ्याला उत्साहात सुरुवात, दिवसभर दर्शनासाठी उसळली अलोट गर्दी
- कोल्हापुर: केएसए फुटबॉल लीगचा महासंग्राम १ डिसेंबरपासून सुरू होणार; वेळापत्रक जाहीर, कधी अन् कोणत्या संघात रंगणार सामने?
- पुणे: रिंगरोड'ला अजित पवारांचे नाव देण्याच्या मागणीवरून रोहित पवारांनी राज्य सरकारची केली कोंडी; पुण्यतिथीला आंदोलनाचा इशारा
- छत्रपती संभाजीनगर: आधी जीआर, मगच माघार!; सुधारित वेतनश्रेणीसाठी राज्यातील ३४ हजार न्यायालयीन कर्मचारी बेमुदत संपावर, कामकाज ठप्प
गुन्हा
- गोंदिया: उदमांजर शिकारप्रकरणी सहा जण जेरबंद; गोंदिया वनविभागाची धडक कारवाई, कामठा परिसरातील घटना
- कोल्हापूर: पुणे रेल्वे प्रवासादरम्यान धक्कादायक घटना हातकणंगलेत रेल्वेखाली सापडून विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; आत्महत्या की घातपात? चर्चांना उधाण
- पुणे: आळंदीत दिवसाढवळ्या थरारक रक्तपात! जुन्या वादातून पीसीएमटी चौकात रिक्षाचालकावर खंजीराने जीवघेणा हल्ला; परिसरात एकच दहशत
- धाराशिव: मोबाईलसाठी पैसे दिले नाही म्हणून जन्मदात्या वडिलांची झोपेतच हत्या; पोटच्या मुलाच्या कृत्याने धाराशिव हादरले!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १४ नोव्हेंबर २०२६: बुधादित्य योग आणि शनिकृपेमुळे या राशींचे नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगते तुमचे भविष्य!
- आजचे राशिभविष्य १३ नोव्हेंबर २०२६: जाणून घ्या तुमचे आजचे ग्रहमान आणि भविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ नोव्हेंबर २०२६: गुरु बनवणार पॉवरफुल योगाचा संयोग, या राशींच्या हातात खेळणार पैसा!
- आजचे राशिभविष्य ३१ ऑक्टोबर २०२६ : त्रिग्रह योगाचा तिप्पट लाभ, जाणून घ्या कशी असेल तुमची रास!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- गोवा: शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत लोकहिताचे काम करत राहणार आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांची गोवा येथे गर्जना
- नवी दिल्ली: पाठिंब्याबाबत शरद पवार गटाच्या संकेतांमुळे NDAला मिळाले बळ; संसदेत १० ते १५ मते अधिक मिळण्याची शक्यता
- कर्नाटक: सौंदत्ती रेणुका देवीच्या दर्शनाला निघालेल्या पुण्यातील कुटुंबावर काळाचा घाला; भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघे जागीच ठार!
- गोवा: महिलांना स्वावलंबी व आत्मनिर्भर बनविण्यावर सरकारचा विशेष भर; आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांचे महत्त्वपूर्ण प्रतिपादन


























Subscribe to my channel



