Maharashtra Weather Forecast : पुढील ७२ तास अवकाळीचं संकट कायम; 'या' जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीटीची शक्यता

Maharashtra Weather Forecast : सध्या जागतिक तापमान वाढ  जाणवत आहे. जून २०२३ ते मार्च २०२४ पर्यंतच्या दहा महिन्यांच्या सरासरीपेक्षा अधिक तापमानाचा उच्चांक मोडलेला आहे. राज्यावर आज देखील अवकाळी पावसाचं संकट कायम आहे. आयएमडीने पुढील 72 तासांत जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

राज्यात पुढील तीन ते चार दिवस पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार कायम आहे. पुढील 48 तासांमध्ये सोसाट्याच्या वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी राज्यात पाहायला मिळणार आहे. काही जिल्ह्यांमध्ये गाटपीट आणि मुसळधार पावसाचा अंदाजही हवामान विभागाने वर्तवला आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे, राज्यासह देशामध्ये अवकाळी पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झालेलं आहे.

Manoj Jarange Patil : ६ जूनपासून पुन्हा उपोषणाला बसणार.. मनोज जरांगे पाटील यांची मोठी घोषणा

हवामान विभागाने विदर्भ, मध्य महाराष्ट्रामध्ये पावसासाठी येलो अलर्ट जारी केला आहे. तर वर्धा, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. गडगडाटासह वादळी वारे, विजा आणि सोसाट्याचा वाऱ्यासह अनेक ठिकाणी हलक्या तुरळक पावसाच्या शक्यता वर्तविण्यात आली आहे.

मार्च महिन्यातील जागतिक पृष्ठभागाचे तापमान २० व्या शतकातील सरासरी ५४.९ अंश फॅरनहाइट (१२.७ अंश सेल्सिअस) पेक्षा २.४३ अंश फॅरनहाइटने (१.३५ अंश सेल्सिअस) जास्त  होते. मार्च महिना विक्रमी तापमानाचा महिना ठरला आहे. तसेच जून २०२३ पासून विक्रमी उच्च जागतिक तापमानाचा सलग १० वा महिना ठरला.

युरोप आणि दक्षिण अमेरिका, आफ्रिका, तसंच पूर्व-उत्तर अमेरिका,पूर्व आशिया आणि पूर्व ऑस्ट्रेलियामध्ये मार्च महिन्याचे तापमान सरासरीपेक्षा जास्त होते. सोमवारपर्यंत उत्तर भारत आणि मध्य भारतात आयएमडीने मोठ्या प्रमाणावर पाऊस, गारा आणि गडगडाटी वादळीपावसाचा अंदाज वर्तवला आहे.

देशात सध्या अवकाळी पावसाने थैमान मांडले  आहे. महाराष्ट्रातही अवकाळी पावसाने पिकांना चांगलंच झोपडलं आहे. राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसामुळे घरे, शेती आणि फळबागांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरी अगदी मेटाकुटीला (Weather) आले आहेत.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply