
Maharahstra Kesari 2023 Winner : पुण्यात रंगलेल्या 65व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत पुण्याचा पैलवान शिवराज राक्षे याने विजय मिळवत महाराष्ट्र केसरी 2023 होण्याचा मान मिळाला आहे. अंतिम सामन्यात शिवराजने सोलापूरच्या महेंद्र गायकवाड याला काही मिनिटातंच थेट चितपट करत विजय मिळवला आहे.
विशेष म्हणजे दोन्ही मल्ल हे पुण्याच्या तालमीतच तयार झाले आहेत. वस्ताद काका पवार आणि गोविंद पवार यांच्या कात्रज येथील आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल तालमीत दोघांनी कुस्तीचे धडे गिरवले आहेत. त्यामुळे वस्ताद काका पवार यांच्या शिष्याने यंदा महाराष्ट्र केसरी होण्याचा मान मिळवला.
महाराष्ट्र केसरी 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्यापूर्वी माती आणि गादी विभागातील फायनलच्या स्पर्धेत शिवराज आणि महेंद्र यांनी विजय मिळवत अंतिम फेरी गाठली होती. यावेळी आधी माती विभागातील अंतिम लढत झाली. ही अंतिम लढत अतिशय चुरशीची झाली. सोलापूरचा सिकंदर शेख आणि पुण्याचा महेंद्र गायकवाड यांनी एकमेंकाना तोडीस तोड खेळ दाखवला. अखेरपर्यंत दोघेही एकमेंकावर भारी पडत होते. पण अखेर 6-4 अशा फरकाने महेंद्रने सिंकदरला मात देत फायनलमध्ये धडक दिली. दुसरीकडे मॅट विभागातील अंतिम लढत पुण्याच्या राजगुरुनगरमधील शिवराज राक्षेआणि नाशिकचा हर्षवर्धन सदगीर यांच्यात पार पडली. ही लढत फारच एकतर्फी झाल्याचं दिसून आलं शिवराजनं सुरुवातीपासून आपलं वर्चस्व सामन्यावर बनवलं आणि अखेर 8-1 अशा मोठ्या फरकाने सामना जिंकत फायनल गाठली.
पुण्यात दिमाखात पार पडली महाराष्ट्र केसरी स्पर्धा
पुण्यात मोठ्या उत्साहात महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडली. स्पर्धेचे दिमाखदार आयोजन आणि प्रत्येक वजन गटात विजेत्यांना मिळणारी भरघोस बक्षिसे यामुळे ही स्पर्धा सुरुवातीपासूनच चर्चेत होती. संस्कृती प्रतिष्ठानचेवतीने संस्थापक अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यंदा 45 संघ आणि 900 हून अधिक पैलवान या स्पर्धेत उतरले होते. कुस्ती शौकिनांनी देखील पुण्यात मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
महाराष्ट्र केसरी स्पर्धेची सुरुवात 1961 साली झाली होती. त्यानंतर आतापर्यंत अनेक मल्लांनी या महाराष्ट्र केसरीची गदा जिंकली आहे. हे मल्ल नेमके कोण ते पाहूया...
आतापर्यंतचे महाराष्ट्र केसरी
1) पैलवान दिनकर दहय़ारी (औरंगाबाद, 1961)
2) पैलवान भगवान मोरे (धुळे, 1962),
3) पैलवान गणपतराव खेडकर (अमरावती, 1964),
4) पैलवान गणपतराव खेडकर (नाशिक, 1965),
5) पैलवान दीनानाथ सिंग (मुंबई, 1966),
6) पैलवान चंबा मुतनाळ (खामगाव, 1976),
7) पैलवान चंबा मुतनाळ (नागपूर, 1968),
8) पैलवान हरिश्चंद्र बिराजदार (लातूर, 1969),
9) पैलवान दादू चौगुले (पुणे, 1070),
10) पैलवान दादू चौगुले (अलिबाग, 1071),
11) पैलवान लक्ष्मण वडार (कोल्हापूर, 1972),
12) पैलवान लक्ष्मण वडार (अकोला, 1973),
13) पैलवान युवराज पाटील (ठाणे, 1974),
14) पैलवान रघुनाथ पवार (चंद्रपूर, 1975),
15) पैलवान हिरामण बनकर (अकलूज, 1976),
16) पैलवान आप्पासाहेब कदम (मुंबई, 1978),
17) पैलवान शिवाजीराव पाचपुते (नाशिक, 1979),
18) पैलवान इस्माईल शेख (खोपोली, 1980),
19) पैलवान बापू लोखंडे (नागपूर, 1981),
20) पैलवान संभाजी पाटील (बीड, 1982),
21) पैलवान सरदार खुशहाल (पुणे, 1983),
22) पैलवान नामदेव मोळे (सांगली, 1984),
23) पैलवान विष्णूजी जोशीलकर (पिंपरी चिंचवड, 1985),
24) पैलवान गुलाब बर्डे (सोलापूर, 1986),
25) पैलवान तानाजी बनकर (नागपूर, 1987),
26) पैलवान रावसाहेब मगर (सोलापूर, 1988),
27) पैलवान आप्पालाल शेख (सोलापूर, 1992),
28) पैलवान उदयराज जाधव (पुणे, 1993),
29) पैलवान संजय पाटील (अकोला, 1994-95),
30) पैलवान शिवाजी केकाण (नाशिक, 1995-96),
31) पैलवान अशोक शिर्के (वर्धा, 1996-97),
32) पैलवान गोरखनाथ सरक (नागपूर,1997-98),
33) पैलवान धनाजी फडतरे (पुणे, 1998-99),
34) पैलवान विनोद चौगुले (खामगाव, 1999-2000),
35) पैलवान राहुल काळभोर (नांदेड, 2001),
36) पैलवान मुन्नालाल शेख (जालना, 2001-02),
37) पैलवान दत्तात्रय गायकवाड (यवतमाळ, 2002-03),
38) पैलवान चंद्रहास निमगिरे (वाशी, 2003-04),
39) पैलवान सईद चाउस (इंदापूर, 2004-05),
40) पैलवान अमोल बुचडे (बारामती, 2005-06),
41) पैलवान चंद्रहार पाटील (औरंगाबाद, 2007),
42) पैलवान चंद्रहार पाटील (सांगली, 2008),
43) पैलवान विकी बनकर (सांगवी पिंपरी-चिंचवड, 2009),
44) पैलवान समाधान घोडके (रोहा, 2010),
45) पैलवान नरसिंग यादव (अकलूज – 2011),
46) पैलवान नरसिंग यादव (गोंदिया – 2012),
47) पैलवान नरसिंग यादव (भोसरी – 2013),
48) पैलवान विजय चौधरी (अहमदनगर-2014),
49) पैलवान विजय चौधरी (नागपूर-2015),
50) पैलवान विजय चौधरी (वारजे-2016),
51) पैलवान अभिजीत कटके (भूगाव-2017),
52) पैलवान बाला रफीक शेख (जालना-2017),
53) पैलवान हर्षद सदगीर (म्हाळुंगे-बालेवाडी-2019),
54) पैलवान पृथ्वीराज पाटील (सातारा-2021-22)
55)पैलवान शिवराज राक्षे (पुणे 2023)
शहर
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- गॅस सिलेंडर पोहचवणाऱ्या डिलिव्हरी बॉयची कमाई किती? एजन्सीला मिळणाऱ्या कमिशनचे संपूर्ण गणित!
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
महाराष्ट्र
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- नागपुरात आता कचरा फेकणाऱ्यांची खैर नाही! नाल्यांत आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर थेट FIR दाखल होणार.
- पुरोगामी कोल्हापूरला काळिमा! गुप्तधनाच्या लालसेपोटी अघोरी पूजा आणि काळ्या जादूचा बाजार; भोंदूगिरीचे वाढते पेव.
गुन्हा
- सेल्फीचा थरार की नियोजित घातपात? शाही लग्नाआधी केतन अग्रवालचा संशयास्पद मृत्यू; होणाऱ्या पत्नीला अटक!
- पुणे: पुन्हा गोळीबाराचा थरार! कात्रज-मंतरवाडी बायपासवर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी झाडल्या ४ गोळ्या.
- उत्तर प्रदेश: कौटुंबिक वादातून सख्ख्या भावाचा क्रूर अंत; भाऊ, भावजय आणि पुतण्याची निर्घृण हत्या!
- मुंबई: कल्याण मध्ये १५ वर्षीय मुलीवर आजोबांच्या वयाच्या दोघांकडून अत्याचार; दोन नराधमांना अटक!
राजकीय
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
इतर
- छत्रपती संभाजीनगरच्या अन्न प्रयोगशाळेत ढिगाऱ्याखाली तपासणी! कर्मचारी कमतरता आणि नादुरुस्त AC मुळे ४ हजार नमुने प्रलंबित.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!
- दैनिक राशिभविष्य २३ जून २०२६: आज कोणाचे नशीब चमकणार? जाणून घ्या तुमची रास काय सांगते!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
देश विदेश
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
- लव्ह मॅरेजनंतर पतीने केला दुसरा विवाह; न्यायासाठी चिमुरड्या मुलासह माय माऊली चढली मोबाईल टॉवरवर!
- भारताची जागतिक भरारी! जहाज पुनर्वापर (Ship Recycling) क्षेत्रात भारत जगात प्रथम क्रमांकावर, २०२५ मध्ये ३५.४ टक्के बाजार हिस्सा.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!


























Subscribe to my channel

