Pimpri : गॅस बुकिंगसाठी 30 दिवसांची प्रतीक्षा, तरी बुकिंगच्या 10 दिवसांनंतरही सिलिंडर मिळेना; एजन्सीबाहेर नागरिकांच्या रांगा

Pimpri : घरगुती गॅस सिलिंडरसाठी नियमानुसार बुकिंग करूनही वेळेत गॅस मिळत नसल्याने शहरातील नागरिक हैराण झाले आहेत. ३० दिवसानंतर गॅस बुकिंग करून, त्यानंतर १० दिवस उलटल्यानंतरही नागरिकांना गॅस मिळत नाही. शाहूनगर, चिखली, संभाजीनगर, पूर्णानगर परिसरात ही समस्या तीव्र झाली आहे. गॅस एजन्सीच्या निष्काळजीपणाचा फटका नागरिकांना बसत आहे. गॅस एजन्सीकडून साठेबाजी; तसेच काळाबाजार केल्यानेच नागरिकांना गॅस सिलिंडर मिळत नसल्याचा आरोप केला जात आहे.

आठ-दहा दिवसांनीही गॅस मिळेना
गॅस बुकिंगसाठी सुमारे ३० दिवसांची प्रतीक्षा करावी लागत आहे. मात्र, बुकिंग झाल्यानंतरही सिलिंडर कधी मिळणार याबाबत कोणतीही स्पष्टता दिली जात नाही. अनेक नागरिकांनी बुकिंग करून आठ ते दहा दिवस उलटूनही गॅस मिळालेला नाही.

शाहूनगर, संभाजीनगर, पूर्णानगर परिसरात चिंचवडच्या राका गॅस एजन्सीकडून भारत गॅसचा पुरवठा होत होता. मात्र, गेल्या पंधरा दिवसांपूर्वी अचानक यांच्याकडील सर्व कनेक्शन अनुसया गॅस एजन्सीकडे ट्रान्सफर केले गेले. याबाबत ग्राहकांना सांगितले नाही. 'अनुसया आणि रतन गॅस एजन्सी संदर्भात अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार या दोन्ही एजन्सीची तपासणी करण्यात येणार आहे. तपासणीमध्ये दोषी आढळल्यास या एजन्सीवर कारवाई करण्यात येईल,' अशी माहिती चिंचवडचे पुरवठा अधिकारी डॉ. विजयकुमार यांनी दिली आहे.

नागरिक त्रस्त
दरम्यान, शाहूनगर येथील एका गृहिणीला या समस्येबद्दल विचारल्यावर त्यांनी, 'मी शाहूनगर येथे राहते. मी १७८ मार्चला गॅस बुक केला. गॅस सिलिंडर डिलिव्हरीसाठी निघाल्याचा मेसेज आला. मात्र, आठ दिवस उलटूनही मला सिलिंडर मिळाला नाही. अनुसया गॅस एजन्सीला फोन केले. मात्र, कॉल उचलले नाहीत,' अशी तक्रार केली. तसेच शाहूनगर येथील आणखी एक रहिवासी ललित शिरोडकरांनी, 'गॅस बुक करून दहा दिवस होऊन गेले. मात्र, अजून गॅस सिलिंडर मिळाला नाही. गॅसची गाडी आली की मी धावत जातो. मात्र, तुमचा गॅस नाही आला, असे सांगितले जाते. सध्या मित्राच्या घरातून गॅस सिलिंडर आणून वापरत आहे,' असे सांगितले.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

1 thought on “Pimpri : गॅस बुकिंगसाठी 30 दिवसांची प्रतीक्षा, तरी बुकिंगच्या 10 दिवसांनंतरही सिलिंडर मिळेना; एजन्सीबाहेर नागरिकांच्या रांगा

Leave a Reply to Kylie2178 Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *