
Kolhapur : पुण्यातील येरवडा जेलमधून चार महिन्यांच्या कैदेनंतर बाहेर पडलेल्या दोन कुख्यात चोरट्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यात धुमाकूळ घातला. आदमापूर येथील शेतात काम करणाऱ्या दोन महिलांकडून पाणी मागण्याच्या बहाण्याने सोन्याचे दागिने हिसकावून त्यांनी पोबारा केला. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने पुणे-बंगळूर महामार्गावर किणी टोलनाक्याजवळून या सराईत गुन्हेगारांना बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून 2 लाख 70 हजार रुपयांची किंमत असलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. याआधीच त्यांच्या रेकॉर्डवर डझनभर गुन्हे नोंदवले गेले आहेत.
जेलमधील ओळखीतून रचला चोरीचा कट
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या या संशयितांची नावे राम ज्ञानोबा केंद्रे (वय 27, मूळ रा. मौजे खोकलेवाडी, ता. गंगाखेड, जि. परभणी; सध्या रा. हिंजवडी, पुणे) आणि मनोज शिवाजी लंगडे (वय 34, मूळ रा. तगरखेडा पोस्ट औराद शहाजनी, ता. निलंगा, जि. लातूर; सध्या रा. सोलापूर रोड, पुणे) अशी आहेत. हे दोघे चार महिन्यांपूर्वी पुण्यातील चोरीच्या गुन्ह्यात येरवडा जेलमध्ये कैदेत होते. तिथे झालेल्या ओळखीतून बाहेर पडल्यानंतर एकत्र चोऱ्या करण्याचा कट त्यांनी रचला. जामीन मंजूर होताच 2 डिसेंबर रोजी एसटीने कोल्हापुरात दाखल झाले आणि चोरीच्या उद्देशाने भुदरगड तालुक्यातील आदमापूरकडे वळले.
|
|
चार दिवस मंदिर परिसरात मुक्काम करून गर्दीत चोरीचा प्रयत्न अयशस्वी झाल्याने त्यांनी गावापासून दूर खळखळीचा माळ येथील शेताकडे लक्ष केंद्रित केले. दि. 7 डिसेंबर 2025 रोजी दुपारी पाणी पिण्याच्या बहाण्याने शेतात काम करणाऱ्या लक्ष्मीबाई सर्जेराव भोसले (वय 67) आणि लक्ष्मी दिनकर पाटील यांच्याकडे जाऊन त्यांच्या गळ्यातील दीड तोळे वजनाचे मंगळसूत्र आणि अर्धा तोळा वजनाची एकसर माळ हिसकावली. या जबरी चोरीप्रकरणी भुदरगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
सीसीटीव्ही फुटेजवरून चोरट्यांचा छडा..
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे चोरट्यांचा शोध घेतला. पुणे-बंगळूर महामार्गावर किणी टोलनाक्याजवळ पानाच्या टपरीजवळ त्यांचा वावर असल्याची माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक सागर वाघ यांच्या नेतृत्वाखालील पथकाने रविवारी (11 जानेवारी) दोघांना ताब्यात घेतले. पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी सांगितले, की राम केंद्रे याच्यावर पुणे, रायगड, लातूर, सोलापूरसह भुदरगडमधील दोन गुन्ह्यांचा रेकॉर्ड आहे. तर मनोज लंगडे याच्यावर पुणे शहर, कोंडवा आणि इतर ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. दोघांनीही आदमापूर येथील चोरीची कबुली दिली असून, त्यांच्याकडून 2 लाख 70 हजार किमतीचे दागिने जप्त केले आहेत.
उपनिरीक्षक शेष मोरे, अंमलदार राजू कोरे, योगेश गोसावी, अमित सर्जे यांच्या पथकाने या गुन्ह्याचा तपास केला. पुढील तपासासाठी संशयितांना भुदरगड पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आले आहे. पोलिसांनी सांगितले, की या चोरट्यांच्या रेकॉर्डमधून आणखी गुन्हे उघडकीस येतील तसेच परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशाराही पोलिसांनी दिला आहे.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ























Subscribe to my channel





https://shorturl.fm/pxCw4