Kolhapur : कोल्हापुरात केमिकल कंपनीला भीषण आग; अग्निशमन दलाचं आगीवर नियंत्रण

 कोल्हापुरातून मोठी बातमी हाती आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीतील शेरा प्लस या कंपनीला भीषण आग लागलेली आहे. ही आग आटोक्यात आणण्यासाठी कोल्हापूर शहर आणि परिसरातील 15 हून अधिक अग्निशमन दलाच्या गाड्या बोलावण्यात आलेल्या आहेत. अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवलं आहे. 

कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीमधील शेराप्लस कंपनीच्या रसायन गोडवूनला आग लागली असून 15 हुन अधिक फायर ब्रिगेडच्या गाड्या घटना स्थळी पोहचल्या आहेत. भीषण आगीमुळं कंपनी जळून खाक झालेली आहे. आगीची तीव्रता जास्त असल्याने धुराचे लोट औद्योगिक वसाहत परिसरात पसरले आहेत.

आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.या आगीमुळे जीवित हानी झाली आहे की नाही याचा तपास सुरू आहे, भीषण आग पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी झाली आहे.

दरम्यान, अग्निशमन दलाच्या जवानांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर कंपनीला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवलं आहे. कंपनी आग लागल्यामुळे आजूबाजूच्या कंपनीलाही आग लागण्याची शक्यता होती. आगीवर नियंत्रण मिळवाता बघ्यांची एकच गर्दी झाली होती. त्यामुळे पोलिसांची मोठी फौज घटनास्थळी दाखल झाली होती.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *