Kalyan News : रस्त्यावर आढळलेली मतदारांचे ओळखपत्र; नोटीस मिळताच मतदार नोंदणी अधिकाऱ्याकडून खुलासा

Kalyan News : लोकसभा निवडणुकीच्या मतदानावेळी बोगस मतदान झाल्याच्या तक्रारी काही उमेदवारांनी केल्या होत्या. तर काही ठिकाणी मतदारांची नावेच मतदार यादीत गायब असल्याचं प्रकार समोर आले होते. त्यावरून राजकारण तापलं होतं. यादरम्यान मतदारांची ओळखपत्र कल्याण शीळ रस्त्यावर सापडल्यानं मोठी खळबळ माजली. त्यानंतर खडबडून जागे झालेले मतदार नोंदणी अधिकाऱ्यांना या प्रकारचा खुलासा केलाय.

कल्याण शीळ रोडवर सापडलेली मतदार ओळखपत्रे ही जुनी आहेत. मतदारांनी जमा केलेली ही मतदार ओळखपत्रे केडीएमसीच्या शाळेत ठेवण्यात आली होती .संबंधीत शाळेतील रद्दी एका टेम्पोतून भरुन दुसरीकडे नेत असताना ओळखपत्रांची गोणी देखील होती. ही गोणी खाली रस्त्यावर पडल्याची माहिती मतदार नोंदणी अधिकारी विश्वास गुजर यांनी दिली. तसेच मतदार ओळखपत्र शासकीय दस्तावेज असल्याने याप्रकरणी संबंधित पाच बीएलोना म्हणजे मतदान केंद्राच्या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा पाठविण्यात आल्या.

Manoj Jarange : "मी मराठ्यांवर अन्याय होऊ देणार नाही," जरांगेंची आक्रमक भूमिका; आरक्षणाचा प्रश्न पैटणार

तसेच याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांचा तपास सुरू आहे. निष्काळजीपणा करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई केली जाईल, अशी प्रतिक्रिया कल्याण मतदार नोंदणी अधिकारी विश्वास गुजर यांनी दिलीय.

आढळलेली मतदार कार्ड जुनी आहेत. नागरिकांना नवीन मतदार ओळखपत्र पाहिजे असल्यास जुनी जमा करावी लागतात. तीच ही ओळखपत्र आहेत. एकूण ७२० जुनी मतदार ओळखपत्र आढळून आली होती, त्यापैकी ६७९ मतदार ओळखपत्र ही २००६ ते २०१४ दरम्यानची आहेत . ४१ स्मार्ट कार्ड ही २०१७ ते २०२१ कालावधीतील आहे.

कल्याण पूर्वेकडील नेतीवली येथील केडीएमसीच्या शाळेत बीएलओमार्फत ही ओळखपत्र जमा करण्यात आली होती. कल्याण शीळ रोडवर आढळलेल्या गोणीत त्या शाळेतील काही विद्यार्थ्यांचे मार्कशीट मिळून आल्याने ही ओळखपत्र कुठून आली आहेत याची माहिती मिळाली असून संबंधित शिक्षण विभागालाही बीएललो असलेल्या शिक्षकांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply