सोलापूर : शहरातील विस्कळीत वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी शहरासाठी ७०० कोटींचे दोन उड्डाणपूल मंजूर केले. पण, भूसंपादनाच्या रकमेवरूनच उड्डाणपूलाचे घोडे अडले. सहा वर्षांत महापालिकेला भूसंपादनाचा ३० टक्के हिस्सा भरता आला नाही. आता प्रशासनाने शासनाच्या मुन्फ्रा या संस्थेकडे ३५.१० कोटींच्या कर्जाचा प्रस्ताव पाठविला असून अजूनपर्यंत त्याला मंजुरी मिळालेली नाही.
कोणत्याही राजकीय पक्षाच्या मदतीशिवाय भाजपने महापालिकेची सत्ता काबिज केली. वर्षानुवर्षे सत्ताधारी राहिलेल्या कॉंग्रेस-राष्ट्रवादीचा पराभव करून सत्तेवर विराजमान झालेल्या भाजप सत्ताधाऱ्यांना पाच वर्षांत समांतर जलवाहिनीचे काम पूर्ण करता आले नाही. त्यामुळे नागरिकांना दिलेले एक-दोन दिवसाआड पाण्याचे आश्वासन पूर्ण करता आले नाही. आजही शहरातील विशेषत: हद्दवाढ भागातील नागरिकांना पाच-सहा दिवसाआड पाणी मिळते. टॅंकरमुक्तीची घोषणा केलेल्या प्रशासनाला त्याठिकाणी पिण्याच्या पाण्याची पाईपलाईनदेखील टाकता आलेली नाही. त्यावर ना सत्ताधाऱ्यांना ना विरोधकांना पर्याय काढता आला. दुसरीकडे मागील पाच वर्षांत शहरातील रस्ते देखभाल-दुरुस्ती व नवीन रस्त्यांवर जवळपास ६० कोटींचा खर्च केला, तरीही रस्त्यांवरील खड्डे बुजलेले नाहीत. दरम्यान, त्या दोन उड्डाणपूलांच्या कामात बाधित होणाऱ्या १३७ मिळकतींपैकी १११ खासगी मिळकतदारांना कधीपर्यंत मोबादला मिळणार, कधीपासून उड्डाणपूलाचे काम सुरु होईल आणि कधीपर्यंत पूर्ण होईल, हे अद्याप कोणीही ठामपणे सांगू शकत नाही. त्यामुळे आणखी काही वर्षे नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास सोसावाच लागेल, अशी स्थिती आहे.
२०१६ मध्ये नितीन गडकरींनी केले होते भूमिपूजन जुना बोरामणी नाका, शांती चौक, वालचंद कॉलेज, आम्रपाली चौक, अशोक चौक, गुरुनानक चौक, महावीर चौक, पत्रकार भवन, जुळे सोलापूर ते मोरारका बंगला असा ४.९२५ किलोमीटरचा एक उड्डाणपूल होणार आहे. तर दुसऱ्या उड्डाणपूलाचा मार्ग जुना पुणे नाका, छत्रपती संभाजी चौक, छत्रपती शिवाजी चौक, मेकॅनिक चौक, भय्या चौक, रेल्वे स्टेशन, डीआरएम कार्यालय, सात रस्ता, शासकीय दूध डेअरी ते पत्रकार भवन असा ७.७ किलोमीटरपर्यंत आहे. २०१६ मध्ये केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी या दोन्ही उड्डाणपूलांचे भूमिपूजन केले होते. तरीही, ते उड्डाणपूल कागदावरून बाहेर आलेले नाहीत, हे विशेष.
तत्कालीन फडणवीस सरकारने सोलापूर शहरातील या दोन्ही उड्डाणपूलांच्या भूसंपादनासाठी २९९ कोटी रुपये मंजूर केले. काही दिवसांनी त्यातील जवळपास ४० कोटी रुपयेदेखील वितरीत केले. पण, भूसंपादनासाठी महापालिकेला द्यावा लागणारा ३० टक्के हिस्सा भरायला पैसे नसल्याने संपूर्ण रक्कम शासनाने द्यावी, असा प्रस्ताव प्रशासनाने पाठविला. पण, त्याला मंजुरी मिळू शकली नाही. त्यानंतर प्रशासनाने आपला हिस्सा कमी व्हावा म्हणून चक्क त्या उड्डाणपूलावरील सायकल ट्रॅक व फुटपाथच काढून टाकण्याचा निर्णय घेतला आणि पुन्हा नव्याने तांत्रिक मान्यता घेतली. या सर्व कागदोपत्री खेळांमुळे अद्याप उड्डाणपूल भूसंपादनाच्या टप्प्यावरच अडकून पडले आहेत.
शहर
- उत्तर प्रदेशच्या विद्यार्थिनींसाठी आनंदाची बातमी! 'राणी लक्ष्मीबाई योजने'अंतर्गत ५० हजार मेधावी मुलींना मिळणार मोफत स्कूटी
- शिवनेरी पायथ्याशी शिवराज्याभिषेकाचा अभूतपूर्व जल्लोष! २६ लाखांच्या हायड्रोलिक लिफ्टचे उद्घाटन; जुन्नरमध्ये 'बिबट सफारी' प्रकल्पाला मंजुरीची घोषणा!
- मुंबईत पाणी माफियांचा खेळ खल्लास! पालिकेकडून वॉटर टँकरसाठी 'OTP' सिस्टीम लागू; आता घरबसल्या करा पारदर्शक बुकिंग!
- उत्तर प्रदेशात 'सैराट'सारखा थरार! परीक्षा केंद्राबाहेर पडलेल्या पत्नीला घेण्यासाठी आलेल्या पतीची साल्याकडून हत्या
महाराष्ट्र
- उत्तर प्रदेशच्या विद्यार्थिनींसाठी आनंदाची बातमी! 'राणी लक्ष्मीबाई योजने'अंतर्गत ५० हजार मेधावी मुलींना मिळणार मोफत स्कूटी
- शिवनेरी पायथ्याशी शिवराज्याभिषेकाचा अभूतपूर्व जल्लोष! २६ लाखांच्या हायड्रोलिक लिफ्टचे उद्घाटन; जुन्नरमध्ये 'बिबट सफारी' प्रकल्पाला मंजुरीची घोषणा!
- मुंबईत पाणी माफियांचा खेळ खल्लास! पालिकेकडून वॉटर टँकरसाठी 'OTP' सिस्टीम लागू; आता घरबसल्या करा पारदर्शक बुकिंग!
- उत्तर प्रदेशात 'सैराट'सारखा थरार! परीक्षा केंद्राबाहेर पडलेल्या पत्नीला घेण्यासाठी आलेल्या पतीची साल्याकडून हत्या
गुन्हा
- पुणे: बंडू आंदेकर टोळीतील सराईत गुंडाला बेड्या; आठ महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणारा ओम नगरकर गजाआड
- पिंपरी-चिंचवड: बनावट 'आरटीआय' कार्यकर्त्यांचा पर्दाफाश: पीएमआरडीए (PMRDA) अधिकाऱ्यांना धमकावून खंडणी उकळणाऱ्या टोळीला अटक!
- उत्तर प्रदेश: शामली धर्मांतर अमली पदार्थ तस्कराचा मुलगा 'आयुष' पाकिस्तानी धर्मप्रसारकांच्या भाषणांचा होता चाहता!
- झारखंड: गर्लफ्रेंडसाठी पोटच्या ३ चिमुरड्या मुलींचा झोपेतच गळा चिरला; निर्घृण तिहेरी हत्याकांडाने देश हादरला
राजकीय
- कोल्हापुरात 'शक्तीपीठ महामार्गा'वरून राजकीय ठिणगी; सतेज पाटील आणि राजेश क्षीरसागर आमनेसामने!
- तृणमूल काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप; २० खासदार 'नॉट रिचेबल', गुप्त बैठका आणि संभाव्य फुटीच्या चर्चांनी ममता बॅनर्जींची चिंता वाढली.
- पंजाब भाजपमध्ये मोठी खळबळ; प्रदेशाध्यक्षपदी के.एस. ढिल्लों यांच्या नियुक्तीनंतर सरचिटणीस डॉ. जगमोहन सिंग राजू यांचा राजीनामा.
- ममता बॅनर्जींना दिल्लीत मोठा धक्का; तृणमूलच्या दोन राज्यसभा खासदारांचा तडकाफडकी राजीनामा.
इतर
- आजचे राशीभविष्य: मंगळाच्या कृपेने या राशींना होणार धनलाभ, मालमत्ता खरेदीचे योग!
- एसटीचा प्रवास आता अधिक हायटेक! सवलतीसाठी 'एनसीएमसी' स्मार्ट कार्ड अनिवार्य, तर बसस्थानकांच्या २०० मीटर परिसरात अवैध वाहतुकीवर बंदी!
- रोज सकाळी जिरे पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर की अपायकारक? डॉक्टरांनी सांगितली सत्यता.
- ८ जून २०२६ रोजी कोणत्या राशींवर होणार धनवर्षाव? जाणून घ्या तुमचे भविष्य!
मनोरंजन
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
देश विदेश
- उत्तर प्रदेश: शामली धर्मांतर अमली पदार्थ तस्कराचा मुलगा 'आयुष' पाकिस्तानी धर्मप्रसारकांच्या भाषणांचा होता चाहता!
- झारखंड: गर्लफ्रेंडसाठी पोटच्या ३ चिमुरड्या मुलींचा झोपेतच गळा चिरला; निर्घृण तिहेरी हत्याकांडाने देश हादरला
- इस्रायलमध्ये उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा; भारत-इस्रायल मैत्रीची नवी गाथा
- दाम्पत्य रस्ता चुकले, जिवाला मुकले! गोवा बांबोळी महामार्गावर कारची दुचाकीला जोरदार धडक; वृद्ध पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू

























Subscribe to my channel


