Jalgaon : महापालिका संकुलातील गाळेभाड्याचे 129 कोटी थकीत; प्रशासन ढिम्म

Jalgaon : महापालिकेच्या व्यापारी संकुलाच्या भाडे निश्‍चिती बाबत सरकार आणि महापालिका प्रशासन यांच्याकडून चालढकल करण्यात येत आहे. त्यामुळे महापालिकेचे आर्थिक नुकसान होत आहे.

त्याला जबाबदार कोण? असा प्रश्‍न शहरवासीय उपस्थित करत आहेत. सर्व गाळेधारकांकडे रेडीरेकनरच्या आठ टक्के म्हणजे, १२९ कोटी रुपये थकीत असल्याची माहिती महापालिकेच्या किरकोळ वसुली विभागातर्फे देण्यात आली.

Chatrapati Sambhajinagar : यंदा आमची दिवाळी नाही; मराठा तरुणांच्या आत्महत्येमुळे विद्यार्थ्यांनी घेतली शपथ

 

त्यातील रेडीरेकनरच्या आठ टक्के दरानुसार फुले मार्केटमधील २९० गाळेधारकांनी पूर्ण भरलेली रक्कम त्यातून वजा करण्यात आली आहे.

जळगाव महापालिकेचे २५ व्यापारी संकुल आहेत. त्यात एकूण २ हजार ७०० गाळे आहेत. त्यातील तीन व्यापारी संकुल वगळल्यास इतर सर्व व्यापारी संकुलातील गाळेधारकांची गाळेकराराची मुदत २०१२ ला संपली आहे. मात्र या गाळेधारकांची अद्याप भाडे निश्‍चिती न झाल्याने महापालिकेचे आर्थिक उत्पन्न ठप्प झाले आहे.

भाडे निश्‍चितीचा जटिल तिढा

महापालिकेच्या संकुलाच्या भाडे निश्‍चितीचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. महापालिकेने रेडीरेक्नर दराच्या आठ टक्केप्रमाणे भाडे आकारणी केली होती. त्याला विरोध करण्यात आला. त्याबाबत मंत्रालयात दावा दाखल करण्यात आला. त्यावर निकाल लागल्याचे सांगण्यात येत आहे.

मात्र प्रत्यक्षात महापालिका प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे सांगण्यात येत आहे. दुसरीकडे महापालिकेकडे आज शहराच्या विकासासाठी निधी नसल्याचे सांगण्यात येत आहे. सरकारकडून येणाऱ्या निधीवर रस्ते व गटार आणि इतर कामे होत आहे. परंतु महापालिकेचे हक्काचे उत्पन्न मात्र मिळत नाही.

मंत्रालयातून दिरंगाई

महापालिकेच्या व्यापारी संकुलाचे भाडे ठरविण्याच्या दराच्या निश्‍चितीबाबत मंत्रालयातून दिरंगाई करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. रेडीरेक्नर आठ टक्के दर आकारून भाडे निश्‍चिती करण्याबाबत महापालिकेचा प्रस्ताव आहे. व्यापाऱ्यांनी रेडीरेक्नर दोन टक्के दराने आकारणी करण्याची मागणी केली आहे.

त्यामुळे हा वाद मंत्रालयात असल्याचे सांगण्यात येत आहे. दुसरीकडे मंत्रालयात त्याबाबत निकाल देण्यात आला आहे. परंतु अद्याप त्याबाबतचा अध्यादेश महापालिकेत आला नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे याबाबत नक्की काय आहे? याचा शहरवासीयांमध्ये संभ्रम आहे.

प्रशासकडून अपेक्षा

महापालिकेत आता प्रशासकीय राज आहे. प्रशासक तथा आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी महापालिकेच्या या शाश्‍वत उत्पन्नाकडे लक्ष देण्याची गरज आहे, त्यांनी सरकारला पत्र पाठवून याबाबत तातडीने निर्णय देण्याची विनंती करण्याची गरज आहे, अशी शहरवासीयांची अपेक्षा आहे. गेल्या दहा वर्षापासून संकुलाचे गाळे भाडे निश्‍चितीकरणाचा तिढा कधी सुटणार हा प्रश्नच आहे.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply