मुंबई: भारतीय कॉर्पोरेट क्षेत्रात आणि शेअर बाजारात ऐतिहासिक क्रांती घडवून आणण्यासाठी रिलायन्स इंडस्ट्जचे (RIL) चेअरमन मुकेश अंबानी यांनी आपला मास्टरप्लॅन जाहीर केला आहे. रिलायन्सची डिजिटल आणि दूरसंचार उपकंपनी असलेल्या 'जिओ प्लॅटफॉर्म्स'चा (Jio Platforms) बहुप्रतिक्षित इनिशियल पब्लिक ऑफरिंग म्हणजेच 'मेगा आयपीओ' (Jio IPO) बाजारात येण्यासाठी पूर्णपणे सज्ज झाला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (AGM) अधिकृत घोषणा केल्यानंतर, कंपनीने शुक्रवारी बाजाराचे नियामक 'सेबी'कडे (SEBI) आपला मसुदा प्रस्ताव (DRHP) दाखल केला आहे. हा आयपीओ तब्बल ४ अब्ज डॉलर्स (सुमारे ३७,७00 कोटी रुपये) उभारणार असून तो भारतीय शेअर बाजाराच्या इतिहासातील आजवरचा सर्वात मोठा आयपीओ ठरणार आहे.
मुकेश अंबानींची भावूक घोषणा; नव्या पिढीकडे नेतृत्व
या महा-आयपीओबद्दल बोलताना मुकेश अंबानी भावूक झाले. ते म्हणाले, "हा माझ्यासाठी, संपूर्ण रिलायन्स कुटुंबासाठी आणि आमच्या करोडो शेअरधारकांसाठी अत्यंत भावनिक क्षण आहे. जिओची ही लिस्टिंग भारताला जागतिक स्तरावर एक तंत्रज्ञान महासत्ता म्हणून सिद्ध करेल." विशेष म्हणजे, मुकेश अंबानी यांनी या ऐतिहासिक आयपीओ प्रक्रियेची पूर्ण धुरा त्यांची पुढची पिढी—आकाश अंबानी, ईशा अंबानी आणि अनंत अंबानी यांच्याकडे सोपवली आहे.
मेटा, गुगल आणि जागतिक दिग्गजांची साथ
जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये केवळ रिलायन्सचीच गुंतवणूक नाही, तर जगातील सर्वात मोठ्या टेक कंपन्यांचा यात सहभाग आहे. मार्क झुकरबर्ग यांच्या 'मेटा' (Meta) कंपनीची जिओमध्ये ९.९८% हिस्सेदारी आहे, तर 'गुगल' (Google) कडे ७.७३% शेअर्स आहेत. याशिवाय सिल्व्हर लेक, केकेआर आणि अबू धाबी इन्व्हेस्टमेंट अथॉरिटी (ADIA) सारख्या जागतिक गुंतवणूकदारांनी २०१6 मध्ये स्थापन झालेल्या या कंपनीवर आधीच मोठा विश्वास दाखवला आहे. या आयपीओमुळे जिओचे बाजार मूल्य (Valuation) तब्बल १३७ अब्ज डॉलर्सच्या (सुमारे ११.५ लाख कोटी रुपये) पार जाण्याचा अंदाज आहे.
पैशांचा वापर आणि जिओचा भविष्यातील मास्टरप्लॅन
कंपनी या आयपीओच्या माध्यमातून २७ कोटी नवीन इक्विटी शेअर्स बाजारात विकणार आहे. यातून येणाऱ्या एकूण निधीपैकी २७,५०० कोटी रुपयांचा वापर जिओ इन्फोकॉमवरील कर्ज कमी करण्यासाठी (Debt Reduction) केला जाईल.
मुकेश अंबानी यांनी जिओच्या भविष्यातील ५ मोठ्या योजना देखील जाहीर केल्या आहेत:
१. १००% ५जी मायग्रेशन: २०३0 पर्यंत भारतातील सर्व युजर्सना 'JioTrue5G' वर स्थलांतरित करणे आणि ६जी (6G) तंत्रज्ञानात भारताला आघाडीवर नेणे.
२. ज्या घरात फायबर नाही, तिथे एअरफायबर: जिओ एअरफायबर (JioAirFiber) द्वारे रोज ६०,००० नवीन घरे जोडणे.
३. प्रत्येकासाठी एआय (AI for Everyone): भारतीय युजर्सच्या गरजांनुसार कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) सेवा आणि स्मार्ट कॉल असिस्टंट उपलब्ध करून देणे.
४. लघु उद्योगांचे डिजिटायझेशन: 'JioPC' आणि सेट-टॉप बॉक्सच्या माध्यमातून लहान व्यापाऱ्यांना क्लाउड कॉम्प्युटिंगची ताकद देणे.
५. जागतिक विस्तार: जिओने स्वतः विकसित केलेले ५जी आणि एआय तंत्रज्ञान परदेशी भागीदारांना निर्यात करणे.
तज्ज्ञांच्या मते, सेबीच्या मंजुरीनंतर जुलै २०२६ च्या उत्तरार्धात हा मेगा आयपीओ किरकोळ गुंतवणूकदारांसाठी खुला होऊ शकतो. यामध्ये किमान ३५% वाटा किरकोळ (Retail) गुंतवणूकदारांसाठी आरक्षित ठेवण्यात आला आहे.
सविस्तर वाचा, लिंक कमेंट मध्ये https://punenews24.in/
शहर
- पुणे: आंबेगाव तालुक्यात बिबट्याची दहशत कायम! निर्गुदसर येथे ब्रिडिंगसाठी आणलेली ६० हजारांची शेळी फस्त, वनविभागाने पिंजरा लावण्याची शेतकऱ्यांची मागणी!
- पुणे: बारामतीत राजकीय भूकंप! सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीत विद्यमान चेअरमन पुरुषोत्तम जगतापांचे बंड, स्वतंत्र पॅनेलची घोषणा केल्याने रंगत वाढली!
- मुंबई: शिवाजी पार्कवर मोठा राडा: कॉकरोच जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांमध्ये जोरदार खडाजंगी, आंदोलनापूर्वीच वातावरण तापले!
- मुंबई: ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंचा मोठा गौप्यस्फोट: मनोज जरांगे पाटलांचे आंदोलन म्हणजे नौटंकी, उपोषणाबाबत केले अत्यंत गंभीर आरोप!
महाराष्ट्र
- पुणे: आंबेगाव तालुक्यात बिबट्याची दहशत कायम! निर्गुदसर येथे ब्रिडिंगसाठी आणलेली ६० हजारांची शेळी फस्त, वनविभागाने पिंजरा लावण्याची शेतकऱ्यांची मागणी!
- पुणे: बारामतीत राजकीय भूकंप! सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीत विद्यमान चेअरमन पुरुषोत्तम जगतापांचे बंड, स्वतंत्र पॅनेलची घोषणा केल्याने रंगत वाढली!
- मुंबई: शिवाजी पार्कवर मोठा राडा: कॉकरोच जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांमध्ये जोरदार खडाजंगी, आंदोलनापूर्वीच वातावरण तापले!
- मुंबई: ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंचा मोठा गौप्यस्फोट: मनोज जरांगे पाटलांचे आंदोलन म्हणजे नौटंकी, उपोषणाबाबत केले अत्यंत गंभीर आरोप!
गुन्हा
- पुणे: कारेगावात दिवसाढवळ्या थरारक गोळीबार पाण्याच्या प्लँटवर कामावर गेलेल्या तरुणाच्या डोक्यात गोळी झाडून निर्घृण हत्या!
- कोलकाता: दुर्गा पूजेच्या नावाखाली ५०-६० कोटींचा महाघोटाळा; माजी मंत्री इंद्रनील सेन यांच्या घरी भल्या पहाटे ईडीची धडक कारवाई
- पुणे: मोरगाव परिसरातील शेरेवाडीत दोन वयोवृद्ध महिलांची झोपेतच धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; दरोड्याच्या संशयाने खळबळ
- बीड: १५ वर्षांच्या मैत्रीचा रक्तरंजित अंत! दारूच्या नशेत चालत्या कारमध्ये सीटबेल्टने आवळला गळा; मित्राचीच हत्या करून मृतदेह घाटात फेकला
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग
- लंडन: युझवेंद्र चहलची काउंटी टीमला भावनिक साद; 3 वर्षे, 9 बळी आणि असंख्य आठवणी चहलचा नॉर्थम्प्टनशायरला भावनिक निरोप

























Subscribe to my channel




