India vs Bangladesh : टीम इंडियाची चिंता वाढली! भारत-बांगलादेश सामन्याआधी मोठी अपडेट, स्टार खेळाडूनं दुखापतीवर केली मात

India vs Bangladesh :आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2023 च्या आगामी 17 वा सामना भारत आणि बांगलादेश  यांच्यात रंगणार आहे. या सामन्यात टीम इंडिया सलग चौथा विजय मिळवण्यासाठी सज्ज झाली आहे. यंदाचा विश्वचषक  भारतात होत असल्याने भारतीय क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. भारत  विरुद्ध बांगलादेश ( सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडिअम  वर होणार आहे. या सामन्याआधी टीम इंडियाची चिंता मात्र वाढली आहे. बांगलादेशचा दुखापतग्रस्त खेळाडू फिट झाला आहे.

बांगलादेशच्या स्टार खेळाडूबाबत मोठी अपडेट

बांगलादेशचा दुखापतग्रस्त स्टार खेळाडू तंदुरुस्त झाला आहे. हा खेळाडू भारत-बांगलादेश सामन्यात मैदानावर उतरण्याची शक्यता आहे. बांगलादेश संघाचा कर्णधार शकिब अल हसन आता तंदुरुस्त झाला आहे. शकिब नेटमध्ये फलंदाजी करताना दिसत आहे. न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यादरम्यान शाकिब अल हसनला दुखापत झाली होती. त्यानंतर तो संघाबाहेर होता. आता बांगलादेश सामन्याआधी शाकिब फिट झाल्याने तो मैदानात उतरण्याची शक्यता आहे.

Tuljapur: "देवी प्रत्येकाचा हिशोब करत असते", तुळजाभवानी देवीच्या दर्शन व्यवस्थेबाबत निलम गोऱ्हे नाराज

भारताची विजयाची हॅटट्रिक

विश्वचषक 2023 मध्ये भारताची वाटचाल विजयी झाली आहे. टीम इंडियाने तीन सामन्यांत विजय मिळवत स्पर्धेत वर्चस्व राखलं आहे. विश्वचषक 2023 च्या गुणतालिकेत भारत पहिल्या स्थानावर आहे. दुसरीकडे, बांगलादेशला आतापर्यंतच्या तीन पैकी फक्त एकाच सामन्यात विजय मिळवता आला आहे. गुणतालिकेत बांगलादेश सातव्या स्थानावर आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यात 19 ऑक्टोबरला पुण्यातील एमसीए स्टेडिअमवर सामना रंगणार आहे. दुपारी 1.30 वाजता नाणेफेक होईल. त्यानंतर 2 वाजता सामन्याला सुरुवात होईल.

टीम इंडियाची चिंता वाढली!

विश्वचषक 2023 सध्या आणखी रोमांचक होताना दिसत आहे. गेल्या तीन दिवसामध्ये मोठा उलटफेर झाला आहे. अफगाणिस्तान आणि नेदरलँड्स या गुणतालिकेत सर्वात खालच्या दोन संघांनी  मोठे स्पर्धक इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला आहे. फगाणिस्तान आणि नेदरलँड्सने दणदणीत विजय मिळवून विश्वचषक स्पर्धेला नवं वळण दिलं आहे. यामुळे टीम इंडियालाही गाफिल राहणं परवडणारं नाही.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply