INS Surat : पाकिस्तानकडून क्षेपणास्त्राची चाचणीची तयारी, त्याआधीच भारताने आएनएस सूरत समुद्रात उतरवले

India Responds to Pahalgam Attack : पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाला पोसणाऱ्या पाकिस्तानची भारताकडून 'नाक'बंदी करण्यात आली. नाक बंद केलं तरी तोंड उघडणाऱ्या पाकिस्ताननं क्षेपणास्त्र चाचणीच्या फुसक्या सोडल्या. पण त्याआधीच 'कंगाल' पाकिस्तानचा भारतानं जबरदस्त बंदोबस्त केला आहे. अरबी समुद्रात क्षेपणास्त्र नष्ट करणाऱ्या आयएनएस सूरत या युद्धनौकेची चाचणी करण्यात आली. एएनआयने भारतीय नौदलाच्या सूत्रांच्या हवाल्याने वृत्त दिलं आहे.

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कठोर कारवाई करताना पाच निर्णय घेत कोंडी करण्याचा प्रयत्न केला. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी पाकिस्तानकडून समुद्रात क्षेफणास्त्राची चाचपणी करण्याचा तयारी सुरू केली होती. पाकिस्तानने अरबी समुद्रात चाचपणी करणार असल्याची अधिसूचना जारी केली होती. भारतानेही त्यांना ठोस प्रत्युत्तर देण्याची तयारी असल्याचे दाखवत INS सूरत समुद्रात उतरवले आहे.

Dombivli : तीन मावस भावांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार, आज डोंबिवली बंद

भारतीय नौदलाकडून अरबी समुद्रात INS सूरतच्या माध्यमातून समुद्रात चाचपणी करण्यात आली. INS सूरत ही भारतीय नौदलाची नवीनतम स्वदेशी क्षेपणास्त्र विनाशिका आहे. INS सूरत मधून समुद्रातून कमी उंचीवरून येणाऱ्या लक्ष्याचा अचूक वेध घेत एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. या यशामुळे भारतीय नौदलाच्या संरक्षण क्षमतेत मोठी वाढ झाली आहे. हे यश भारतीय नौदलाच्या स्वदेशी युद्धनौका डिझाइन, विकास आणि संचालनातील वाढत्या प्रभुत्वाचे आहे. यासोबतच, हे भारताच्या संरक्षण उत्पादनात आत्मनिर्भरतेच्या वचनबद्धतेचेही प्रतीक आहे.

आयएनएस सूरत युद्धनौकेची लांबी 164 मीटर असून रुंदी 18 मीटर तर वजन 7600 टन आहे. शत्रूंवर तिन्ही बाजूंनी मारा करण्यासाठी ब्रह्मोस मिसाइल, बराक मिसाईल, पाणबुड्या विरोधी रॉकेट लॉन्चर आणि स्पेशल भारतीय बनावटीच्या गन्स या युद्धनौकेवर आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply