IND vs SA Super 8 South Africa won by 76 runsImage Credit source: Social Media and Bcci X Account
आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत टीम इंडियाला सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात पहिल्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. भारताने साखळी फेरीत चारही सामने जिंकले होते. त्यामुळे टीम इंडिया सुपर 8 फेरीतही सामना जिंकून सलग आणि एकूण पाचवा विजय मिळवेल असा विश्वास चाहत्यांना होता. मात्र दक्षिण आफ्रिकेने अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये टीम इंडियाची विजयी घोडदौडीला ब्रेक लावला. दक्षिण आफ्रिकेने यासह साखळी फेरीनंतर सुपर 8 मध्येही विजयी सलामी दिली. दक्षिण आफ्रिकेचा हा टी 20I वर्ल्ड कपच्या 10 व्या पर्वातील सलग आणि एकूण पाचवा विजय ठरला. दक्षिण आफ्रिकेने या विजयासह उपांत्य फेरीच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकलं आहे.
सामन्यात काय झालं?
एडन मार्करम याने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंह या जोडीने दक्षिण आफ्रिकेला झटपट 3 झटके दिले. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेची 3 आऊट 20 अशी स्थिती झाली होती. मात्र त्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या त्रिकुटाने धमााका केला. डेवाल्ड ब्रेव्हीस (45), डेव्हीड मिलर (63) आणि ट्रिस्टन स्टब्स या (44*) त्रिकुटाने केलेल्या वादळी खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 187 धावा केल्या. त्यामुळे टीम इंडियाला 188 धावांचं आव्हान मिळालं. मात्र दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांसमोर भारताला 20 ओव्हरही खेळता आलं नाही. दक्षिण आफ्रिकेने भारताला 18.5 ओव्हरमध्ये 111 रन्सवर गुंडाळलं. दक्षिण आफ्रिकेने यासह हा सामना 76 धावांनी आपल्या नावावर केला.
शिवम दुबेची एकाकी झुंज, इतर फलंदाज ढेर
टीम इंडियासाठी एकट्या शिवम दुबे याने झुंज दिली. शिवमने सर्वाधिक 42 धावा केल्या. मात्र दुबे व्यतिरिक्त एकालाही 20 पार मजल मारता आली नाही. टीम इंडियाच्या इतर फलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेसमोर गुडघे टेकले. दक्षिण आफ्रिकेसाठी मार्को यान्सेन याने सर्वाधिक 4 विकेट्स मिळवल्या. तर केशव महाराज याने एकाच ओव्हरमध्ये 3 विकेट्स घेत कमाल केली. कॉर्बिन बॉश याने दोघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर कॅप्टन एडन मार्करम याने 1 विकेट मिळवली.
टीम इंडियाचा टी 20i वर्ल्ड कप 2026 मधील पहिला पराभव
South Africa win by 76 runs in Ahmedabad. #TeamIndia set their sights on a turnaround in the next game.
Scorecard ▶️ https://t.co/ZE8J4fF18z#T20WorldCup | #MenInBlue | #INDvSA pic.twitter.com/xBIBwjEEmF
— BCCI (@BCCI) February 22, 2026
टीम इंडिया अहमदाबादमध्ये पुन्हा अपयशी
दरम्यान टीम इंडियाला आयसीसी स्पर्धेत पुन्हा एकदा अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पराभूत व्हावं लागलंय. भारताला याच मैदानात 19 नोव्हेंबर 2023 रोजी ऑस्ट्रेलिया विरुद्ध वनडे वर्ल्ड कप फायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर टीम इंडियाने आयसीसी स्पर्धेतील सर्व सामने जिंकले होते. मात्र याच मैदानात टीम इंडियाच्या आयसीसी स्पर्धेतील विजयाची साखळी तुटली आहे.
शहर
- पुणे: लोणावळ्यात मोठी दुर्घटना! रायफल साफ करताना अचानक गोळी सुटून माजी नगरसेवकाच्या ३३ वर्षीय मुलाचा मृत्यू
- पुणे: ऐतिहासिक कसबा गणपती मंदिरात मध्यरात्री चोरी; दानपेटी फोडून ६० हजारांची रोकड लंपास
- मुंबई: विद्यार्थ्यांना चांगला आहार मिळावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाचा आदेश; दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी योजना वाढवण्याचे संकेत
- मुंबई: राज ठाकरेंनी आंदोलनात जाऊन रोहित पवारांचे कान टोचले; भाजपचा जोरदार हल्लाबोल
महाराष्ट्र
- हिंगोली: सोयाबीन पिकाची नासाडी डोळ्यांसमोर पाहून वसमतमधील ६० वर्षीय शेतकऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
- सातारा: कराडला 'ऑक्टोबर हीट'चा प्रचंड तडाखा! वाढत्या उकाड्याने नागरिक घामाघूम, तर कडक उन्हामुळे रस्त्यांवरील वर्दळ थंडावली
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगावर धडकण्यासाठी राहुल आणि प्रियंका गांधींचा 'गनिमी कावा'आकाशवाणी भवनात ठिय्या आणि राजकीय संघर्ष शिगेला
- पुणे: लोणावळ्यात मोठी दुर्घटना! रायफल साफ करताना अचानक गोळी सुटून माजी नगरसेवकाच्या ३३ वर्षीय मुलाचा मृत्यू
गुन्हा
- पुणे: ऐतिहासिक कसबा गणपती मंदिरात मध्यरात्री चोरी; दानपेटी फोडून ६० हजारांची रोकड लंपास
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: कॉकरोच जनता पार्टीची अत्यंत मोठी घोषणा; थेट १० ऑक्टोबरला दिल्लीत आंदोलनाचे रणशिंग, सरकारची वाढली डोकेदुखी
- नवी दिल्ली: हरदीप सिंह पुरी, बी. एल. वर्मांसह ८ विद्यमानांना डच्चू; राज्यसभेच्या ८ जागांवर भाजपाचा 'नवा चेहरा'
- उत्तर प्रदेश: विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा मेगाप्लॅन! पक्षांतर्गत सर्वेक्षणात मोठा गौप्यस्फोट, १०० हून अधिक विद्यमान आमदारांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान






















Subscribe to my channel


