IND vs AUS 1st T20 : वर्ल्डकपविजेत्या ऑस्ट्रेलियाला 'सूर्या'ग्रहण! यादवच्या स्फोटक खेळीनं रचला विजयाचा पाया, रिंकूच्या षटकाराचा कळस

IND vs AUS 1st T20 : पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यात  टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. अखेरच्या षटकातील १ चेंडू शिल्लक असताना २०९ धावांचे लक्ष्य गाठून टीम इंडियाने शानदार विजयाची नोंद केली. पहिल्या टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभूत करत भारताने वर्ल्डकपमधील पराभवाचा बदला घेतला.

टी२० सामन्याचा हा सामना विशाखापट्टणमच्या वायएस राजशेखर रेड्डी क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला.  कर्णधार म्हणून  सूर्यकुमार यादव यांच्या नेतृत्वातील संघाने पहिला सामना जिंकलाय. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने ३ गडी गमावून २०८ धावा केल्या होत्या.या सामन्यात कर्णधार सूर्यकुमार यादवने टीम इंडियासाठी सर्वात मोठी खेळी खेळली. त्याने ४२ चेंडूत ८० धावा केल्या. तर इशान किशननेही ५८ धावा केल्या.

Ind Vs Aus Final : ऑस्ट्रेलियाचा 'सिक्सर'! मोदी स्टेडियमवर भारताचे स्वप्न भंगले... वर्ल्ड कप फायनलमध्ये पराभव

तर रिंकू सिंगने २२ धावा करत नाबाद राहिला. रिंकूने विजयी षटकार लगावत भारताला १-० आघाडी मिळवून दिली. सूर्यकुमार यादवला 'प्लेअर ऑफ द मॅच' म्हणून घोषित करण्यात आलं. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाच्या संघाने २० षटकांत ३ गडी गमावून २०८ धावा करत भारतासमोर २०९ धावांचे आव्हान ठेवले होते. ऑस्ट्रेलियाचा फलंदाज जोश इंग्लिसने ११० धावा केल्या तर स्टीव्ह स्मिथने २२० च्या स्ट्राईक रेटने ५२ धावा केल्या. भारताकडून गोलंदाजी करताना बिश्नोई आणि कृष्णा यांनी प्रत्येकी १ बळी घेतले.

ऑस्ट्रेलियाच्या संघाने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाची सुरुवात मात्र खराब राहिली. पहिल्याच ओव्हरमध्ये ऋतुराज गायकवाडच्या रुपात भारताला पहिला धक्का मिळाला. त्यानंतर संघाच्या २२ धावा असताना टीम इंडियाने आपली दुसरी विकेटही गमावली. दुसरी विकेट यशस्वी जयस्वालच्या रुपात गेली होती. त्याने २१ धावा संघासाठी जोडल्या. त्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव आणि इशान किशनने डाव सावरला. इशान किशनने अर्धशतक केलं. इशान बाद झाल्यानंतर मैदानावर आलेल्या रिंकूने तडाखेबाजी फलंदाजी केली. विजयी षटकार मारत भारताला विजय मिळवून दिला.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply